September 14, 2024

कबीर प्रकट दिवस 2022 [Marathi] : तारीख, उत्सव, कार्यक्रम, इतिहास

Published on

spot_img

कबीर प्रकट दिवस कबीर परमेश्वरजी पृथ्वीवर प्रकट झाल्याच्या निमित्ताने कबीर प्रकट दिवस साजरा केला जातो. भगवान कबीरांनी काशी, उत्तर प्रदेश, भारतातील लहरतारा तलावात कमळाच्या फुलावर अवतार घेतला होता. नीरू-नीमाने त्यांना तिथून उचलून घरी नेले, ज्यांना त्यांचे मनलेले आई वाडिल म्हणतात. लोकवेदामुळे कबीर परमेश्वर जी यांना संपूर्ण जग विणकर, कवी किंवा संत मानते. पवित्र वेद देखील कबीर देवाचा महिमा गातात. पवित्र ऋग्वेद मंडल 9 सूक्त 94, मंत्र 1 आणि मंडल 9 सूक्त 96 मध्ये मंत्र 17 ते 20 मध्ये असे लिहिले आहे की तो परमेश्वर शरीरासह या पृथ्वीवर येतात आणि दोहे आणि स्तोत्राद्वारे संपूर्ण जगाला तत्वज्ञान देतात. कबीर परमेश्वर जी यांची खरी जीवनकथा आणि लीला जाणून घ्या. 600 वर्षांपूर्वी कबीरजींनी या पृथ्वीवर अवतार घेतला होता.

HindiEnglishગુજરાતીবাংলাಕನ್ನಡঅসমীয়া

Table of Contents

कबीर प्रकट दिवस का साजरा केला जातो?

 कबीर प्रकट दिवस काशीतील लहरतारा तलावात 600 वर्षांपूर्वी कबीर परमेश्वरजींच्या अवतरणाच्या निमित्ताने कबीर प्रकट दिवस साजरा केला जातो. कबीर परमेश्वर आपल्या सर्व जीव आत्म्यांचे पिता तसेच सतलोक आणि संपूर्ण विश्वाचे निर्माता कबीरपरमेश्वर आहे, सर्व आत्म्यांना तत्वज्ञान समजावून सांगण्यासाठी आणि मुक्तीचा मार्ग आणि सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी या पृथ्वीवर (मृत्यू लोक) आले होते. ज्याद्वारे आपण सर्व आत्मे सतलोक प्राप्त करू शकतो.

कबीर परमेश्वर जी एक विणकर म्हणून जगले आणि आपल्या सर्वांना हे दाखवण्यासाठी हे केले की ज्याला देवाची प्राप्ती करायची आहे त्याला पैसा, संपत्ती आणि उच्च जातीची गरज नाही. कबीर देव जन्मत नाही आणि मरत नाही.  कबीर परमेश्वरांच्या 120 वर्षांच्या लीला मध्ये त्यांनी अनेक चमत्कार केले आणि दाखवून दिले की ते पूर्ण परमात्मा आहेत.

परमेश्वर कबीर साहेबांचे काशीतील वास्तव्य: संक्षिप्त जीवन चरित्र

कबीरसाहेब जी 1398 (विक्रमी संवत 1455) मध्ये ज्येष्ठ शुद्धी पौर्णिमेला लहरतारा तलावात ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी (सूर्योदयाच्या दीड तास आधी) लहरतारा तलावाच्या वरच्या कमळाच्या फुलावर नवजात बाळाच्या रूपात प्रकट झाले.) त्या दिवशी अष्टानंद ऋषी, जे दररोज या वेळी स्नान करून आध्यात्मिक ध्यान साधना करत होते, त्यांना आकाशातून एक गोलाकार आगेसारखा गोळा येताना दिसला, ज्यामुळे त्यांचे डोळे विस्फारले.  डोळे मिटले तेव्हा त्याला मुलाचे रूप दिसले, त्याने पुन्हा डोळे उघडले तेव्हा तो प्रकाश लहरतारा तलावाच्या एका कोपऱ्यात सम्पताना दिसत होता.

अष्टानंद ऋषी त्यांच्या गुरुदेव स्वामी रामानंदजींकडे गेले आणि विचारले की ही माझ्या भक्तीची उपलब्धी आहे की माझा भ्रम आहे.  स्वामी रामानंद जी म्हणाले की ही ना तुमच्या भक्तीची उपलब्धी आहे ना तुमचा भ्रम आहे.  अशी क्रिया वरील लोकांतील एखादा अवतार किंवा सिद्ध व्यक्ती पृथ्वीवर आल्यावर करतात आणि मातेच्या उदरात आश्रय घेतात.  स्वामी रामानंदजींना फारसे ज्ञान नव्हते की परमपिता परमेश्वर कधीच आईच्या पोटातून जन्म घेत नाही.

भगवान कबीर जी, यांचे नीरू आणि नीमाला मुलाच्या रूपात मिळणे.

नि:संतान दंपत्ति नीरू आणि नीमा, लहरतारा तलावामध्ये ब्रम्ह मुहूर्ताच्या वेळी, स्नान करण्यासाठी जात असत. नीरू आणि नीमा त्या जन्मामध्ये हिंदू ब्राह्मण गौरीशंकर आणि सरस्वती होते. त्यांना बळजबरीने मुसलमान बनविले होते. त्यामुळे त्यांनी कपडे विणने ( विणकराचे काम ) सुरू केले होते.

त्या दिवशी स्नानासाठी जातांना, रस्त्यामध्ये नीमा रडत होती आणि आपल्या भगवान शिव ला प्रार्थना करीत होती, जर! आम्हाला सुद्धा एक मुलगा झाला तर, ज्यामुळे त्यांचे जीवन सफल झाले असते. नीरु आणि नीमाला, भलेही मुसलमान बनविले होते, तरीही त्यांची श्रद्धा, भगवान शंकरामध्येच होती, ज्यांची ते इतक्या वर्षांपासून पूजा करीत असत. नीरू, नीमाचे सांत्वन करीत होता, ” नीमा, आपल्या नशिबात जर मुलगा असता, तर भगवान शिव, ने आपल्याला जरूर दिला असता. आता आपल्या नशिबात कोणतेही अपत्य नाही. तुम्ही, अशा प्रकारे रडून, तुमचे डोळे खराब करू नका. आपल्याजवळ, म्हातारपणामध्ये, आपली काळजी घेणारा कोणीही नाही. तु रडू नकोस.”

अशा रीतीने, गप्पा गोष्टी करीत ते लहरतारा तलावाजवळ पोहचले. सर्वात अगोदर नीमा ने स्नान केले. नंतर, ती पुन्हा, तलावामध्ये, स्नानाच्या वेळेस नेसलेले कपडे धुण्यासाठी गेली. तेंव्हा नीरू तलावामध्ये स्नान करीत होता, तर नीमा ने काही तरी हलतांना बघितले. बालकाच्या रूपात, दैवीय कार्य कबीर जी करीत होते, त्यांच्या तोंडामध्ये एका पायाचा अंगठा होता आणि दूसरा पाय, हवेमध्ये हलवित होते. ती घाबरली की, तो साप तर नाही आणि तो तिच्या पतीला डंख तर मारणार नाही? जेंव्हा तीने लक्षपूर्वक बघितले, तर तीला कमळाच्या फूलावर एक लहान बालक दिसला. ती ओरडली, ” बघा! बालक बुडणार? बालक बुडणार?”

नीरू ने विचार केला की, नीमा वेडी झाली आहे, आता तीने, पाण्यात, लहान मूल बघणे सुरू केले. नीरू ने म्हटले, “नीमा, मी तुला सांगतो की, तु मुलाच्या बाबतीत जास्त विचार करू नकोस. आता तर तुला पाण्यामध्ये सुद्धा मुले दिसू लागलेत. “नीमा ने म्हटले, “हो, खरोखरच. ते पहा! बालक बुडणार,” तिच्या आवाजातील कातरता समजून, त्याने बघितले की, नीमा कोणीकडे इशारा करीत आहे. त्याने तेथे खरोखरच एका बालकाला बघितले. नीरूने बालक रूपातील भगवान कबीर जी, यांना कमळाच्या फूलासह उचलून, नीमाला दिले. त्यानंतर नीरु स्नान करण्यासाठी आत गेला.

नीरूने विचार केला की, (कारण, माणूस समाजाबाबतीत जास्त चिंता करतो.) “जर आम्ही या बालकाला घरी नेले तर, लोक विचारतील की, आम्ही हे मुल कोठून घेऊन आलो. जर आम्ही म्हटले की, आम्हाला कमळाच्या फूलावर मिळाले, तर कोणीही आमच्यावर विश्वास ठेवणार नाही. ते म्हणतील की, आम्ही कोणाचा तरी मुलगा चोरून आणला आणि त्याची आई रडत असेल. ते राजाकडे तक्रार करतील आणि आम्हाला सजा करतील. आम्हाला हिंदुंचे कोणतेही समर्थन नाही आणि आम्ही आज पर्यंत मुसलमानांशी कोणताही संबंध वाढविला नाहीं.”  नीरू स्नानानंतर बाहेर आला. त्याने बघितले नीमा, एका आई सारखी, बालकाच्या रूपातील भगवान कबीर जींचे लाड करीत होती, कधी त्यांना गळ्याशी लावत होती, ती आपल्या शिव भगवान चे लाख लाख उपकार मानीत होती की, त्यांनी, त्यांची अपेक्षा पूर्ण केली.

कबीर परमेश्वर, ज्यांच्या नावाचा जाप केल्याने, आमच्या आत्म्यामध्ये एक विशेष हालचाल होते. जी मिळविण्यासाठी ॠषि- मुनी यांनी आणि महर्षिंनी हजारो वर्षांपर्यंत तप करून आपल्या शरीराचा क्षय केला. त्या भगवानला बालक रूपात, नीमा कडेवर घेऊन होती. ती कोणत्या आनंदाचा उपभोग घेत होती, यांचे वर्णन करता येत नाही. नीरू ने नीमाला म्हटले, “नीमा तु या मुलाला येथेच ठेव. हेच आमच्यासाठी चांगले राहील. “नीमा ने नीरू ला म्हटले,” माहित नाही, या मुलाने, माझ्यावर काय जादू केली. मी त्याला सोडू शकत नाही, मी मरू शकते.” नीरूने तिला आपले विचार सांगीतले की, त्यांना गावातून काढून टाकतील आणि मुलाला सुद्धा हिसकावुन घेतील. नीमा ने म्हटले, “मी या मुलांसाठी वनवास सुध्दा स्विकारेल.” नीरू ने म्हटले,” नीमा तु खूप जिद्दी झाली आहेस. तू माझी गोष्ट सुद्धा समजून घेत नाहीस. मी नेहमी करता तुझ्याशी प्रेमाने वागतो, कारण की, आपली कोणतीही संतान नाही. मी तुला कधीही रागावलो नाही, कारण, तुझी आत्मा दुःखी होऊ नये. असा विचार करून मी, नेहमीकरता तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तु आता हट्टी झाली आहेस आणि माझी गोष्ट मानीत नाही.”

त्या दिवशी नीरू ने, आपल्या जीवनात, प्रथमच नीमाला, थप्पड मारण्यासाठी हात उगारला होता. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. त्याने प्रेमाने आणि रागाने म्हटले, “तु माझी गोष्ट ऐकून घेत नाही. या मुलाला, येथेच सोडून दे. नाही तर आता मी, तुला थप्पड मारणार.”

तेंव्हा परमात्मा कबीर जीं नी बालक रूपात म्हटले, “नीरू, मला घरी घेऊन जा. कोणीही, काहीही बोलणार नाही.‌ मी तुमच्यासाठीच आलो आहे. “एका दिवसाच्या मुलाला बोलतांना बघून नीरू घाबरला. काही न बोलता नीरू पुढे चालू लागला. नीमा ने मुलाच्या प्रेमामुळे कबीर साहेबांचे म्हणणे ऐकले नाही. गांवामध्ये गेल्यानंतर लोकांनी विचारले की, त्यांना हा मुलगा कोठे मिळाला? नीरु ने म्हटले की, त्यांना मुलगा कमळाच्या फूलावर मिळाला. लोकांनी ते ऐकले. काहींनी विश्वास ठेवला, काहींनी नाही. परंतु , त्यांनी त्याकडे जास्त लक्ष दिले नाही. गांवातील लोक त्या खूपच सुंदर मुलाला बघण्यासाठी पोहचले.

मुलाच्या रूपातील भगवान कबीर जी  यांची सुंदरता, बघून पूर्ण शहर, हैराण झाले. राजासुद्धा त्या सुंदर मुलाला बघण्यासाठी आला. स्वर्गाचे देवता सुद्धा बालक रूपातील कबीर यांची सुंदरता बघत होते. प्रत्येकजण आप-आपले अनुमान लावित होता की, ही देवता, भूत किंवा गंधर्व ची आत्मा असून शकते, ज्यामुळे नीमा नाराज होत होती, आणि म्हणत असे, ” तुम्ही माझ्या मुलावर वाईट नजर ठेऊ नका.” लोक म्हणत होते की, बालक कोणती तरी देवता वाटतो. स्वर्गामध्ये देवता म्हणत होते की, बालक, ब्रम्हा, विष्णु आणि शिव यांचा अवतार आहे, असे वाटते. वर ब्रम्हा, विष्णु आणि शिव म्हणत होते की, बालक, पारब्रम्ह ( परमेश्वर) चा अवतार असून शकतो.

परमेश्वर कबीरसाहेबांचे पोषण एका कुवाऱ्या गाईच्या दुधाने होते.

 कबीर परमेश्वर बाळाच्या लीलामय शरीराच्या रूपात 25 दिवसांचे झाले होते.  त्यानि काहीही खाल्लेले किंवा प्यालेले नव्हते, तरीही दिवसातून दोनदा एक किलो दूध पिणाऱ्या मुलाप्रमाणे त्याचे शरीर वाढत होते.  नीमाला भीती वाटत होती की हे मूल मरेल.  तिला वाटले की जर हे मुल मेले तर “मीही त्याच्याबरोबर मरेन.”  ती आपल्या भगवान शंकरजींना आठवून रडत होती, “हे भगवान शंकर जी, एकतर तुम्ही हे मूल आम्हाला द्यायला नको होते. आता तुम्ही त्या मुलाला घेऊन जात आहात.”  भगवान कबीरजींनी विचार केला, “मी मरणार नाही. पण ही वृद्ध महिला या तणावात नक्कीच मरेल”.

परमेश्वर कबीरसाहेबांनी भगवान शिवाला प्रेरणा दिली. भगवान शिवाने पाहिले की कोण त्याचे स्मरण करत आहे. भगवान शंकर साधूच्या रूपात तेथे आले. तो नीमाला विचारतो की ती का रडत आहे.  नीमाने त्यांना सांगितले की, माझे मूल काही खात नाही, पीत नाही.  “तो मरेल, आणि मी त्याच्याबरोबर मरेन.”  भगवान शिवाने नीमाला विचारले, तिचा मुलगा कुठे आहे?  नीमाने कबीरसाहेबजीला भगवान शंकराच्या चरणी ठेवण्याचा विचार केला.  जेव्हा ती बालक कबीरला शिवाच्या चरणी ठेवत होती, तेव्हा तो हवेत तरंगत भगवान शंकराच्या मस्तकाच्या पातळीवर पोहोचला.

नीमाला वाटले की हा या संताचा मंत्रमुग्ध आहे.  भगवान शिव आणि भगवान कबीर साहेबजी यांनी सात वेळा चर्चा केली.  भगवान कबीरसाहेबजी भगवान शिवाला म्हणाले, “नीरू-नीमाला एक गाय आणायला सांगा. तुम्ही तिच्या पाठीवर थाप द्या. ती दूध देईल.”  भगवान शंकर नीमाला म्हणाले, “आई, तुझे मूल मरणार नाही.  त्याचे वय खूप मोठे आहे.  त्याच्या गौरवाला अंत नाही.  तू धन्य आहेस.  धन्य हे शहर जिथं एवढा महान आत्मा आला आहे.”

 नीमाला वाटले की संत फक्त तिचे सांत्वन करत आहेत.  तेव्हा भगवान शिव म्हणाले, “तू एक कुवारी गाय आणि एक नवीन भांडे आण.”  नीरूनेही तेच केले.  नवीन भांडे कासेच्या खाली ठेवले होते.  भगवान शिवाने गाईच्या पाठीवर थाप दिली.  कासेतून दुधाच्या धारा वाहू लागल्या.  भांडे भरल्यावर दूध बंद झाले.  कबीर परमेश्वरजींनी ते दूध प्यायले.

 नीमा यांनी संतांचे आभार मानले.  त्याला वाटले की हे सर्व साधूने केले आहे.  नीमाने दक्षिणा देण्यासाठी आपली असहायता व्यक्त केली.  भगवान शिव म्हणाले, “मी पैसे मागणाऱ्यांमध्ये नाही. मी तुला दुःखात पाहिले आहे म्हणून मी येथे आलो आहे.”  असे सांगून भगवान शिव निघून गेले. त्यानंतर ती रोज गायी दूध देऊ लागली. कबीर परमेश्वर जी ते दूध प्यायचे. अशा प्रकारे परमेश्वर कबीरसाहेबजींचे पालनपोषण करण्याचे दिव्य कार्य पूर्ण झाले.

पवित्र ऋग्वेद मंडळ 9 सूक्त 1 मंत्र 9 मध्ये असे म्हटले आहे की देवाचे पालनपोषण करण्याचे दैवी कार्य कुमारी गायीच्या दुधाने होते.  भगवंताच्या या ओळखीवर, फक्त भगवान कबीर जी सत्यात उतरतात.

 वयाच्या ५ व्या वर्षी कबीरजींनी त्यांच्या लीलामय शरीरातून (शरीराने दैवी कृत्ये करणे) सुप्रसिद्ध संतांशी आध्यात्मिक चर्चा सुरू केली.  कोणताही संत किंवा ऋषी त्याच्या आध्यात्मिक ज्ञानाचे उत्तर देऊ शकला नाही.

भगवान कबीर जींनी गुरु केले.

भगवान कबीर जींनी गुरु करण्यासाठी एक लीला केली आणि अडीच वर्षाच्या बालकाचं रूप घेतलं. ब्रह्म मुहूर्तासमयी, गंगा घाटाच्या पायऱ्यांवर झोपले. स्वामी रामानंद जी स्नानासाठी, ब्रह्म मुहूर्तावर गंगाघाटावर जात असत. स्वामी रामानंद जींच्या खडावा कबीर साहेब जींच्या डोक्याला लागल्या. भगवान कबीर साहेबजी, नाटक करत, लहान मुलासारखे रडू लागले. स्वामी रामानंद जी अचानक वाकले, त्यांची एक मण्याची तुळशीमाळा, (जी एक वैष्णव संताची ओळख असते), भगवान कबीर जींच्या गळ्यामध्ये पडली. स्वामी रामानंद जींनी बालक रूपातील कबीर परमेश्वर जींच्या  डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बेटा ! राम-राम म्हण. रामाच्या नामाने दुःखांचा नाश होतो. भगवान कबीर जींनी रडणं बंद केलं. स्वामी रामानंद जींनी बालक रूपातील कबीर जींना, पुन्हा घाटावर बसवुन, स्नान करण्यासाठी निघून गेले, असा विचार करून, की हे बालक चुकून येथे पोहोचलं असेल. आपण त्याला आपल्या आश्रमात घेऊन जाऊ. ते बालक, ज्यांचे कोणाचेही असेल, ते त्याला तिथून घेऊन जातील. भगवान कबीरजी तिथून अदृश्य झाले आणि आपल्या झोपडीमध्ये पोहोचले.

तेव्हा भगवान कबीर जींनी एकदा, स्वामी रामानंदजींचे शिष्य, विवेकानंद जींना त्या श्रोत्यांच्या समोर प्रश्न केला, ज्यांना ते विष्णुपुराण ऐकवत होते, की परमात्मा कोण आहेत? विवेकानंदजीं कडे कोणतंच उत्तर नव्हतं. अत: श्रोत्यांसमोर आपली पत राखण्याकरिता, त्यांनी बालक रूपातील, परमेश्वर कबीरजींना रागावणं सुरू केलं, की त्यांची जात आणि त्यांचे गुरु कोण आहेत?  तिथे उपस्थित श्रोत्यांनी सांगितलं, की कबीर जी खालच्या जातीतील धाणक/ विणकर आहेत. भगवान कबीर जी म्हणाले, “माझे गुरु आपले देखील गुरु आहेत. मी स्वामी रामानंद जींकडून दीक्षा घेतली आहे”. विवेकानंद जी हसले,” बघा लोकहो! हे बालक खोटं बोलत आहे. स्वामी रामानंद जी खालच्या जातीतील लोकांना दीक्षा देत नाहीत. मी स्वामी रामानंद जींना सांगेल आणि मग तुम्ही सगळे सुद्धा, उद्या येऊन बघा, कि स्वामी रामानंद जी, या बालकाला कशा प्रकारे दंडित करतील”.

 विवेकानंद जींनी स्वामी रामानंद जींना सर्व कथन केलं. स्वामी रामानंद जींनी देखील, क्रोधित होऊन बालकाला आणण्यासाठी सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान कबीरजींना, स्वामी रामानंद जींच्या समोर आणण्यात आलं. स्वामी रामानंद जींनी, आपल्या झोपडीसमोर, हे दाखवण्यासाठी एक पडदा लावला, की त्यांना दिक्षा द्यायची गोष्ट तर सोडा, त्यांच्याजवळ खालच्या जातीतील दर्शक देखील नाहीत. स्वामी रामानंद जींनी अत्यंत क्रोधात, पडद्या पलीकडून कबीर परमेश्वर जींना विचारलं, की ते कोण आहेत? भगवान कबीर जी म्हणाले,”हे स्वामी जी, मी या सृष्टीचा निर्माता आहे. हा संपूर्ण संसार माझ्यावर आश्रित आहे. मी, वर सनातन धाम सतलोकात रहातो.”

स्वामी रामानंदजी हे ऐकून नाराज झाले. त्यांनी त्याला फटकारलं आणि त्यांना काही प्रश्न विचारले. ज्यांचं एक आदर्श शिष्या प्रमाणे आचरण करीत, भगवान कबीर जींनी शांती आणि विनम्रतेने उत्तर दिले. तेव्हा रामानंद जींनी विचार केला, या बालका सोबत चर्चा करण्यासाठी बराच वेळ लागेल, आपण अगोदर आपल्या दैनिक- धार्मिक साधना पूर्ण करू या.

स्वामी रामानंद जी ध्यान अवस्थेमध्ये बसुन, कल्पना करीत होते, की त्यांनी स्वतः गंगाजल आणलं आहे, भगवान विष्णूच्या मूर्तीला स्नान करवलं, वस्त्र बदलले, माळ घातली आणि शेवटी मूर्तीच्या मस्तकावर यथावत मुकुट ठेवला आहे. त्यादिवशी स्वामी रामानंद, मूर्तीच्या गळ्यामध्ये माळ घालायला विसरले. त्यांनी माळ मुकुटाच्या वरून घालण्याचा प्रयत्न केला. परंतु माळ अडकली. स्वामी रामानंद जी व्यथित झाले आणि स्वतःशीच म्हणू लागले, कि “माझ्या संपूर्ण जीवनामध्ये, मी आजपर्यंत कधीही अशी चूक केली नव्हती.मी आज अशी काय चूक केली, की असं झालं?” तेव्हा कबीर परमेश्वर जी म्हणाले, “स्वामीजी! माळेची गाठ सोडा. आपणास मुकुट उतरवावा लागणार नाही”. रामानंदजींनी विचार केला, “मी तर केवळ कल्पना करत होतो, इथे कोणतीही मुर्ती नाही आहे. मध्ये एक पडदा देखील आहे आणि हा बालक जाणत होता, की मी मानसिक रूपात काय करत आहे.” ते काय गाठ उघडणार. इथपर्यंत की त्यांनी पडदा देखिल फेकून दिला आणि विणकर जातीच्या बालक रूपातील, कबीर परमात्म्यांना मिठी मारली. रामानंद समजून गेले, की हे ईश्वर आहेत.

मग पाच वर्षाच्या बालक रूपातील, भगवान कबीर जींनी 104 वर्षांचे, महात्मा स्वामी रामानंद जींना ज्ञान समजावलं. त्यांनी त्यांना सतलोक दाखवला. त्यांचं वास्तविक अध्यात्मिक ज्ञान सांगितलं आणि रामानंद जींना दीक्षा दिली‌. कबीर परमेश्वर जींनी, रामानंद जींना, सांसारिक दृष्ट्या आपला गुरु बनुन राहण्यासाठी सांगितलं, अन्यथा येणाऱ्या पिढ्या म्हणतील, कि गुरू प्राप्त करण्याची काही आवश्यकता नाही. कारण की कबीर जींचा देखील, कोणी गुरु नव्हता. स्वामी रामानंद जींनी त्यांना विनंती केली, की ते असं करू शकत नाहीत, कारण की ते जाणत होते, कि ईश्वराचा गुरु बनणे पाप आहे. भगवान कबीर जी म्हणाले, आपण माझी आज्ञा समजून याचं पालन करा.”

परमेश्वर कबीर जींचे इतर चमत्कार

हिंदू आणि मुस्लीम धर्मगुरूंच्या तक्रारीवरुन, सिकंदर लोधी ने एका गर्भवती गायीला मधोमध कापलं होतं आणि भगवान कबीर जींना सांगितलं होतं, की जर ते अल्ला्ह आहेत, तर तिला जिवंत करावं, अन्यथा तो त्यांचं शीर कापेल. भगवान कबीर जींनी गाय आणि तिच्या बछड्याची पाठ थापटली. दोघेही जिवंत झाले. भगवान कबीर जींनी त्या गायीच्या दुधाने बादली भरली. सिकंदर लोधी ने कबीर जींना दंडवत प्रणाम केला.

◼️ सिकंदर लोधी चा शरीर दाहाचा आजार बरा केला

सिकंदर लोधी महाराज एक असाध्य आजाराने पीडित होता. (त्याला शरीर दाहाचा आजार होता ). त्याने अनेक वैद्यांकडून इलाज केला आणि काही धार्मिक अनुष्ठान करून घेतले, परंतु काही फायदा झाला नाही. तेव्हा कोणीतरी त्याला कबीर परमेश्वर जींबद्दल सांगितलं. तो परमेश्वर कबीरजीं जवळ गेला. भगवान कबीर जींनी केवळ आपल्या आशीर्वादाने त्याला बरं केलं.

◼️ स्वामी रामानंद जी यांना जिवंत केलं

 सिकंदर लोधी ने स्वामी रामानंद जींचा क्रोधित होऊन वध केला होता. भगवान कबीर जींनी स्वामी रामानंद जींना, आपल्यासमोर पुन्हा जिवंत केलं. हे पाहून सिकंदर लोधी ने कबीर परमेश्वरांची शरण ग्रहण केली.

◼️ कमाल-कमालीला जिवंत केलं

परंतु सिकंदर लोधीचा, मुसलमान पिर शेखतकी ला कबीर परमेश्वरां बद्दल आकस निर्माण होऊ लागला. तो सिकंदर लोधी ला म्हणाला, “मी त्याला अल्ला्ह तेव्हाच मानेल, जेव्हा तो माझ्यासमोर एका मृत व्यक्तीला जिवंत करेल”. सिकंदर ने परमात्मा कबीर जींजवळ आपली अडचण सांगितली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पाहिलं, की एक 12-13 वर्षाच्या मुलाचं शव, नदीमध्ये तरंगत आहे. कबीर जींनी शेखतकीला अगोदर प्रयत्न करण्यास सांगितले. शेखतकीने प्रयत्न केला, परंतु अयशस्वी झाला. तेव्हा भगवान कबीर जींनी बालकाला जिवंत केलं. तिथे उपस्थित सर्व लोक म्हणाले “कमाल” (चमत्कार) केली! कमाल केली! मुलाचं नाव कमाल ठेवलं गेलं. भगवान कबीर जींनी त्याला आपल्या पुत्र रूपामध्ये आपल्याजवळ ठेवलं.

परंतु शेखतकीने हे पाहून सुद्धा, कबीरजींची शक्ती मानली नाही आणि पुन्हा म्हणाला, “मी त्याला अल्ला्ह तेव्हा मानेल, जेव्हा तो माझ्या मृत मुलीला पुनर्जीवित करेल, जीला कबरीमध्ये दफन केलेलं आहे. तो मुलगा कदाचित मेलेला नव्हता. तारीख ठरवली गेली. निर्धारित तिथीवर अनेक लोक चमत्कार पाहायला पोहोचले. भगवान कबीर जींनी त्या मुलीला जिवंत केलं. सर्व म्हणाले, कमाल केली! कमाल केली! मुलीचे नाव कमाली ठेवले गेले. ती शेखतकी सोबत जाण्यास नकार देत म्हणाली, “आता मी आपल्या असली पित्या सोबत राहिल”. त्याने दीड तासापर्यंत सत्संग केला आणि लोकांना सांगितलं, की हाच अल्लाहू अकबर आहे. ती आपल्या पित्याला म्हणाली, “शेखतकी, तू आपले कर्म खराब करू नकोस, त्यांना ओळख. ते सर्वोच्च भगवान आहेत.” हजारो लोकांनी कबीर परमेश्वराची शरण ग्रहण केली. अशाप्रकारे परमेश्वर कबीर जींचे एक पुत्र आणि एक पुत्री झाले. भगवान कबीर जींनी विवाह केला नव्हता.

◼️ सेऊ ला जिवंत केलं

भगवान कबीर जी एकदा कमाल आणि शेख फरीद (त्यांचा एक शिष्य) यांसोबत दिल्लीमध्ये, आपले शिष्य संमन (पिता), सेऊ (पुत्र ) आणि नेकी (आई) त्यांच्याकडे गेले. परिवार अत्यंत गरीब होता. त्यादिवशी त्यांच्याजवळ अन्न नव्हतं. त्यांनी (संमन आणि सेऊने) चोरी करण्याची योजना बनवली, रात्री शेजारील दुकानातून, एक शेर पीठ (1शेर = 1 किलो जवळ-जवळ ) सेऊने आत जाऊन, आपले पिता संमनला पीठ दिलं. यादरम्यान दुकान मालकाला जाग आली. त्याने सेऊचे पाय धरुन ठेवले. संमनने आपली पत्नी नेकीला पीठ दिलं. नेकी त्याला म्हणाली कि सेऊचं शिर कापून टाका, नाहीतर तो दुकान मालक गुरुदेवांना शिक्षा करवेल. संमनने तसंच केलं, पहाटे जेव्हा त्यांनी परमेश्वर कबीरजी तसेच इतर पाहुण्यांसाठी भोजन तयार केलं, भगवान कबीर जींनी सेऊला बोलावलं, सेऊ आला आणि जेवण्यासाठी पंगती मध्ये बसला. संमन आणि नेकी हे पाहून हैराण झाले, कि सेऊच्या मानेवर कापल्या ची कोणतीच निशाणी नाही आहे . त्यानंतर त्या गल्लीमध्ये संमन खूप श्रीमंत झाला.

◼️ लाखो लोकांचे असाध्य रोग बरे केले

काशीमध्ये आपल्या 120 वर्षांच्या, लांब प्रवासा दरम्यान भगवान कबीर जींनी, लाखो लोकांच्या असाध्य आजारां सोबतच, इतर समस्या देखील सोडवल्या. ते आपल्या प्रिय आत्म्यांना, आपला आध्यात्मिक उपदेश देण्याकरिता, काशी व्यतिरिक्त, एका दिवसात शेकडो स्थानांवर प्रगट होत असत. कारण की तेव्हा दूर संचाराचं कोणतंच साधन नव्हतं.

त्याकाळी भारताची एकूण लोकसंख्या जवळपास चार कोटी होती. भारतामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, इराक आणि इराण देखील सामील होते. अस्पृश्यता देखील अगदी टोकाची होती. त्याकाळी एक धाणक/ विणकराचे, संपूर्ण भारतामध्ये 64 लाख शिष्य होणे. यावरून समजते, की ते एक सामान्य संत नव्हते. ते स्वतः भगवान होते. आणि आपण त्यांना ओळखू शकलो नाही.

भगवान कबीर जी आध्यात्मिक ज्ञान समजावत असत.

भगवान कबीर जी आपल्या पवित्र ग्रंथांच्या आधारे आध्यात्मिक ज्ञान सांगत असत. ते म्हणत असत, “हिंदू आणि मुसलमान दोन्ही भक्तीच्या योग्य पध्दतीचा अभ्यास करत नाहीत. गीताजी देवतांच्या पूजेच्या बाजूने नाही, नाही हजरत मोहम्मदजींनी कधी मांस भक्षण केले. हे अज्ञानी धर्मगुरू आपल्याला दिशाभूल करत आहेत. “परंतू त्यावेळी आपण अशिक्षित होतो. केवळ ब्राह्मणांना शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार होता. नकली धर्मगुरु जनतेस हे सांगून दिशाभूल करत असत की, कबीरजी तर अशिक्षित आहेत. त्यांना पवित्र ग्रंथांचे ज्ञान असूच शकत नाही कारण त्यांनी ते वाचलेच नाहीत. तो खोटारडा आहे.” त्यांच्या बहकाव्यात येऊन आपण कबीर परमेश्वरजींचे शत्रू झालो. त्यावेळेस नकली धर्मगुरुंमुळे लोकांमध्ये कबीर परमेश्वरांच्या नामाप्रति घृणा उत्पन्न झाली होती.

कबीर परमेश्वरांनी सांगितलेल्या आध्यात्मिक ज्ञानाला न समजून लोक त्यांच्यावर दगडांचा वर्षाव  करू लागले. हिंदू धार्मिक नेता हिंदूंना हे सांगून दिशाभूल करत असत की, “कबीर आपल्या धर्मावर टिका करीत आहे. तो आपल्या त्रिमूर्तिवर टिका करीत आहे.” मुस्लिमांचे धार्मिक नेता म्हणत, “तो आपल्या धर्मावर टिका करत आहे. तो स्वतः ला  अल्लाह म्हणत आहे.” ते व भ्रमित जनता कबीर साहेबजींना सर्वप्रकारे कष्ट देत असत.

शेख तकी ने कबीर परमेश्वरांना  52 वेळा मारण्याचे प्रयत्न केले गेले.

शेख तकी त्या वेळेस भारतातील सर्व मुसलमानांचा सुत्रधार होता. त्याने कबीर परमेश्वरांना मारण्याचा 52 वेळा  प्रयत्न केला. त्याने कबीरजींना एका मोकळ्या विहीरीत टाकले होते. विहीरीला वरून, माती, लाकूड़, शेण,  रेती, झाड़ झुडपं इत्यादींनी भरून  टाकले होते. शेख तकी, त्यानंतर  सिकंदर लोधीला खबर देण्यासाठी गेला की,  कबीरजी मृत्यला प्राप्त झाले. परंतू , त्याने कबीरजींना सिकंदर लोधी बरोबर बसलेले पाहिले. शेख तकी हैवान इथेच नाही थांबला.

त्याने कबीर परमेश्वरजींना उकळत्या तेला ने भरलेल्या कडढाईत बसण्यास सांगितले. भगवान कबीर जी उकळत्या तेलाच्या कढाईत पण आरामात बसले होते. त्यांना काहीही झाले नाहीत. शेख तकी एक वेळेस रात्रीला काही गुंडांना घेऊन कबीर परमेश्वरजींच्या झोपडीत घेऊन गेला. त्यांनी आपल्या तलवारींनी कबीर परमेश्वरजीं वर  6 – 7 वेळा वार केले. प्रत्येक वेळेस भगवान कबीरजीं च्या   शरीरातून तलवार निघून जात. असे वाटत होते की, जसे कापसा सारख्या मऊ वस्तुला स्पर्श करत आहोत, त्यांचे शरीर पूर्णतः अस्थी विरहीत होते. त्यांना मृत समजून गुंड मागे हटले. कबीरजींनी उभे राहात म्हटले, ” शेख तकी, असे जाऊ नका. थोडे पाणी तर घेऊन जा.”  सर्व त्यांना भूत समजून पळून गेले. गुंडांना ताप आला. तरी पण भगवान कबीरजीं नी त्यांना चांगले केले.

कबीरजीं ना एका रक्त पिपासू हत्ती समोर ठेवले, जो नशेत होता.  भगवान कबीरजीं नी त्याला हिंस्त्र सिंहाचे रूप दाखवले. सिंहाला पाहून हत्तीने लिद टाकली आणि भितीने पळू लागला.

कबीर परमेश्वरजींच्या गळ्यात एक खूप अवजड दगड बांधून गंगा नदीत टाकून दिले होते. दोरी तूटून गेली. दगड डूंबून गेला. भगवान कबीरजी नदीवर बसले होते. नदी कबीर साहेबजीं चे चरण स्पर्श करत होती. त्यानंतर दगडांचा मारा केला गेला. १२ तास तोफा चालवल्या परंतू ,  अविनाशी ला काय मारले जाऊ शकते? एवढ्या वेळेस मारण्याचा  प्रयत्न केल्या नंतर पण परमेश्वर कबीरजीं चा मृत्यु नाहीं झाला. वास्तविक तेच शाश्वत ईश्वर आहेत.

कलयुगाची 5505 वर्ष 1997 ला पूर्ण झाली.

भगवान कबीरजीं नी आपल्या सच्च्या आध्यात्मिक ज्ञानाला आणि पूजेच्या पध्दतीला आपल्या प्रेमळ आत्म्या  पर्यंत पोहोचण्यासाठी कडा संघर्ष केला. ते जानत होते की, आज समाज अशिक्षीत होण्याच्या कारणाने त्यांना नाही ओळखू शकत,  त्यासाठी कबीर परमेश्वरजींनी जवळजवळ 600 वर्ष पहिले धर्मदासजीं ना म्हटले होते की, ”कलयुगाची 5505 वर्ष (1997 ई.) झाल्यावर समाज शिक्षित होईल.  मी पुन्हा येईन आणि त्या वेळी सर्व संसार माझा आश्रय घेईल.  त्या वेळ सारे जग स्वतंत्र होईल. जो पर्यंत वेळ येत नाही, माझे शब्द निराधार वाटतील”

परमेश्वर कबीर यांनी मगहर येथे देह त्याग केला

जेव्हां आपल्या सनातन स्थानी परत जाण्याची वेळ आली, तेव्हा कबीर परमेश्वर यांनी ह्या नाशवंत संसाराचा त्याग करण्यासाठी मगहर या शहराची निवड केली, कारण त्यावेळच्या धर्मगुरू द्वारे एक विषेश भ्रम पसरविला होता की, “मगहर येथे मरणारे गाढव होतात आणि जे काशी येथे मरतात ते स्वर्गात जातात.” वयाच्या 120 व्या वर्षी कबीर साहेब काशी येथून मगहर येथे जाण्यासाठी तीन दिवस पायी चालले होते कारण त्यांना हे दाखवायचे होते की एका सत्य भक्तास म्हातारपणी देखील काही त्रास होत नाही.

 त्यांचे शिष्य काशी चे राजा बीरदेव सिंह बघेल यांनी हजारो सशस्त्र सैनिक आणि कबीर साहेब यांना पाहणाऱ्या लोकांनी त्यांचा मगहर पर्यंत पाठलाग केला. मगहर चा राजा बिजली खां पठाण, हे देखील कबीर परमेश्वर यांचे शिष्य होते त्यांनी देखील यथेच्छ व्यवस्था केली होती. सतलोकी जाण्या पुर्वी परमेश्वर कबीर यांनी तेथील आटलेल्या आमी नदी मध्ये पाणी प्रवाहित केले होते.

  कबीर साहेब यांनी बघितलं की हिंदू राजा बीरदेव सिंह बघेल आणि मुस्लिम राजा बिजली खान पठाण दोघांनी आप आपली सेना सज्ज ठेवली आहे. कबीर साहेब यांनी त्यांना विचारले की तुम्ही तुमचं सैन्य का आणलं आहे ? तेव्हां बीरदेव सिंह बघेल आणि बिजली खान पठाण दोघांनी आपल्या माना खाली झुकविल्या. आलेल्या हिंदू आणि मुस्लिम सैनिकांनी आप आपली इच्छा सांगितली की, तुम्ही आमचे गुरु आहात आम्ही तुमचा अंतिम संस्कार आमच्या धर्मा नुसार करु. जर आमच्या धर्मा नुसार नाही झाला तर युद्ध करु. “परमेश्वर कबीर म्हणाले की, मी 120 वर्षे तुम्हाला हेच शिकवले का? तुम्ही दोघे हिंदु आणि मुसलमान आताही स्वतःला वेगळे समजता !

 कबीर भगवान यांनी तेथे उपस्थित सर्वांना काही वेळ आध्यात्मिक ज्ञान सांगितले. कबीर भगवान जाणत होते की त्यांनी आपल्या मनातिल उद्देश नाही बदलला, ते वरुन वरुन त्यांना हो म्हणत होते परंतु मनाने हो म्हणत नव्हते.

 सतलोकी जाण्यापूर्वी कबीर जी एका चादरी वर झोपले आणि दुसऱ्या चादरी ने स्वतः ला झाकून घेतले. भक्तांनी श्रद्धेने चादरी वर फुले ठेवली. काही वेळा नंतर कबीर परमेश्वर यांनी आकाशातुन म्हटले की, चादर उचला तुम्हाला माझ शरीर नाही मिळणार. तेथे जे काही मिळेल ते दोन भागात वाटुन घ्या परंतु आपसात लढु नका।

  जेव्हा सगळ्यांनी आकाशात पाहिलं तेव्हा एक चमकदार प्रकाश वर जात होता. जेव्हा त्यांनी चादर उचलली तेव्हा कबीर परमेश्वर यांच्या शरीराच्या आकाराचे फुलं दिसली. ते सगळे रडायला लागले आणि म्हणत होते की आम्ही आमच्या परमेश्वराला अतिंम वेळी देखील सुख नाही देऊ शकलो. कबीर जी वास्तविक परमेश्वर आहेत. आम्ही त्यांना ओळखले नाही. जे हिंदू-मुसलमान थोड्या वेळा पुर्वी एकमेकांशी लढायला तैयार होते ते जसे आईवडील मेल्यानंतर रडतात तसे ऐकमेकांना बिलगून भाऊ बहिणी सारखे गळ्यात गळे टाकून रडत होते. त्यांनी फुलांना दोन भागात वाटुन घेतलं. आज त्याच स्थळी मगहर येथे स्मारक आहे. एकीकडे परमेश्वर कबीर जी यांचे हिंदू मंदिर आहे आणि दुसरीकडे मुस्लिम मजार आहे. मध्ये एक दार आहे. तेथे कोणीही स्मारक पाहण्यास जाऊ शकतो. याप्रमाणे परमेश्वर कबीर जी यांनी हिंदू आणि मुसलमान यांच्या मध्ये होणारे युद्ध रोखले आणि दोघांना भावकीची शिकवण दिली.

इतर संप्रदाय देखील कबीर प्रकट दिवस साजरा करतात

कबीर सागर अध्याय कबीर वाणी पान क्रमांक 136-137 मध्ये बारा कबीर पंथांचे वर्णन आहे. परमेश्वर कबीर जींनी धर्मदास जींना म्हटले होते की त्या बारा संप्रदायांमध्ये फक्त काळाचाच आदेश असेल. ते कबीर जींचे नाव घेतात आणि सतलोकाची महती सांगतात, परंतु ते काळाचीच पुजा करतात. ज्यांच्यापासून या पंथांची उत्पत्ती होईल ते पवित्र आत्मे असतील, परंतु त्यांच्या येणाऱ्या पिढ्या काळा द्वारे प्रेरीत राहतील. अध्याय कबीर चरीत्र बोध पान क्रमांक 1870 वर बारा पंथांची नावे लिहिली आहेत. पुढे कबीर वाणी पान क्रमांक 137 वर लिहिले आहे की बाराव्या पंथात कबीर परमात्मा स्वतः येतील आणि सर्व पंथांचा शेवट करतील. पुढे पान क्रमांक 134 वर “वंश प्रसार” शीर्षकामध्ये कबीर परमेश्वर म्हणतात की, तेरावा वंश ज्ञानाचा सगळा अंधकार दुर करेल. त्या तेराव्या पंथाची सुरुवात संत रामपालजी महाराज यांनी केली आहे. त्यांच्या वंशाची सुरवात बाराव्या कबीर पंथाद्वारे झाली आहे जो गरीबदास जींचा पंथ आहे. सतगुरु रामपाल जींचे गुरूदेव स्वामी रामदेवानंद जी यांनी संत रामपालजींना गुरूपदाची जवाबदारी देताना म्हटले होते की, “तुमच्या सारखा जगात कोणी संत होणार नाही.”  ते कबीर परमेश्वर यांचे अवतार आहेत. सन 1997 मध्ये परमेश्वर कबीर यांनी संत रामपालजींना प्रत्यक्ष भेट दिली आणि सतनाम व सारनाम याचे रहस्य प्रकट करण्याचा आदेश दिला. ती वेळ आलेली आहे जेव्हा पुर्ण संसार त्यांची शरण घेईल.

येथे हे वर्णन करण्याचा उद्देश हा आहे की बारा आणखी कबीर पंथ आहेत जे कबीर प्रकट दिवस साजरा करतात. संपूर्ण भारतात अन्य काही आणखी कबीर पंथ आहेत जे काळाच्या प्रेरणेने उत्पन्न झाले आहेत. ते सगळे कबीर साहेब प्रकट दिवस साजरा करतात, परंतु फक्त कबीर साहेब यांच्या द्वारे अधिकृत संत (कबीर वाणी अध्यायानुसार तेरावा पंथ) हाच प्रकट दिवसाचा खरा मार्ग सांगेल.

कबीर प्रकट दिवस कसा साजरा केला जातो?

संत गरीबदास जी यांच्या पवित्र सदग्रंथ साहिब जींच्या 5-7 दिवसीय मार्गाला अनुसरून संत रामपाल जींच्या अध्यात्मिक प्रवचनाने हा प्रसंग साजरा केला जातो. असे ते सुरवातीपासून करीत आले आहेत. ह्या व्यतिरिक्त हुंड्याविना विवाह, रक्तदान आणि देहदान शिबिर, भंडारा, सत्य अध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत जागरूकता आणि अध्यात्मिक पाखंडाच्या विरूद्ध जागरूकता, हा प्रकट दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

  • विना हुंडा विवाह: रमैणी: शेकडो विना हुंडा विवाह, म्हणजे रमैणी, खूप साध्या पद्धतीने संपन्न होतात. विभिन्न धर्म, राज्य आणि जातींचे वर-वधू एक पैसाही न देता व घेता विवाह करतात. वर आणि वधू खूप साधे कपडे घालून विवाह करतात. त्यांच्या सोबत आलेल्या पाहुण्यांना भंडाऱ्यामध्येच जेवण दिले जाते. रमैणी विवाह करण्याचा उद्देश विवाहामध्ये हुंडा आणि अवाजवी खर्च, यांसारख्या सामाजिक प्रथा नष्ट करणे आहे.
  • रक्तदान आणि देहदान शिबीर: दरवर्षी कबीर साहेब प्रकट  दिवसांच्या दरम्यान रक्तदान आणि देहदान शिबिरे आयोजित केले जातात. शेकडों लोक स्वेछेने रक्तदान करतात आणि मानवतेच्या कल्याणासाठी मृत्यूनंतर देहदान करण्याची नोंदणी करतात.
  • मोफत जेवण देणे: संत रामपाल जी महाराज यांच्या तर्फे आयोजित कबीर साहेब प्रकट दिवशी भंडाऱ्यामध्ये  सर्व पदार्थ शुद्ध देशी तुपाचा उपयोग करून बनविले जातात. जेवणामध्ये काही गोड पदार्थ समाविष्ट असतात, जसे- लाडू, जिलेबी, बुंदी प्रसाद. त्याचबरोबर वेगवेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि पुऱ्या, चटणी, लोणचे आणि सॅलेड. हा भंडारा सर्वांसाठी मोफत असतो.
  • सत्य अध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार करणे: संत रामपाल जी महाराज यांचे अध्यात्मिक प्रवचन प्रकट दिवसाचा मुख्य भाग असून ते प्रत्येक धर्माच्या पवित्र शास्त्रावर आधारित आहे. संत रामपाल जी भक्त समाजाला खरे अध्यात्मिक ज्ञान सांगण्यासाठी प्रोजेक्टरच्या माध्यमातून पवित्र पुस्तकांना दाखवितात. कबीर साहेब प्रकट दिवशी भगवान कबीर जींचे महात्म्य आणि जवळ-जवळ 600 वर्षांपूर्वी काशी मध्ये त्यांच्या 120 वर्षांच्या दीर्घ जीवनावर लक्ष केंद्रीत केले जाते.
  • धार्मिक पाखंडांच्या विरोधात जागरूकता निर्माण करणे: जसे की वर सांगितले आहे, 12 कबीर पंथ आहेत, तसेच इतर पंथ सुद्धा आहेत. अनेक वेगवेगळे धर्म आहेत, जे पवित्र ग्रंथांनुसार पूजा करीत नाहीत. परिणामस्वरूप, त्या धर्म आणि पंथांच्या शिष्यांपैकी कोणीही कबीर भगवान पासून लाभ मिळवू शकले नाही. भगवान कबीर जी स्वतः संत रामपाल जींच्या रूपात आलेले आहेत. त्यांनी वर्तमान काळात चालू असलेल्या धार्मिक पाखंडांचा पर्दाफाश केला आणि पवित्र ग्रंथांद्वारे अध्यात्माचा खरा मार्ग दाखविला. त्यांच्या आदेशानुसार त्यांचे भक्त कबीर साहेब प्रकट दिवसाच्या निमित्ताने त्या खऱ्या अध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार करतात.

आम्ही दरवर्षी कबीर प्रकट दिवस का साजरा करतो?

भगवान कबीर जी यांनी सांगितलेली खरी पूजा विधी सर्व कष्टांचा नाश करते. परमेश्वर कबीर जी स्वतः सर्वॊच्च परमेश्वर  आहेत. ते इच्छेनुसार काहीही करू शकतात. येथे काशी मध्ये आपल्या 120 वर्षांच्या दीर्घ आयुष्याच्या दरम्यान त्यांनी अनेक लोकांचे आजार बरे केले. त्यांनी आपल्या 64 लाख भक्तांचे कष्ट दूर करण्याबरोबरच त्यांना पूर्ण मोक्ष प्राप्त करण्यासाठी खरे मंत्र दिले. भगवान कबीर जी, यांचा येथे प्रकट होण्याचा उत्सव साजरा करणे, ह्यापेक्षा चांगले कारण कोणते असू शकते?

कबीर जींनी गरीबदास जींना सतज्ञान दिले होते:

भगवान कबीर जी वेळोवेळी येऊन आपल्या प्रिय आत्म्यांना भेटत असतात, त्यांना सत्य ज्ञान देतात. ते संत गरीबदास जी यांना भेटले व त्यांना म्हटले,

मैं रोवत हू सृष्टी को, ये सृष्टी रोवे मोहे।

गरीबदास इस वियोग को, ‌समझ न सकता कोये ।।

ह्या वाणीमध्ये संत गरीबदास जी म्हणत आहे की, कबीर परमेश्वर म्हणतात, ‘हे गरीबदास!‌ मी दुनियेसाठी रडत आहे की, तुम्ही सर्व माझी मुलं आहेत, मी तुमचा बाप आहे. तुम्ही इथे ह्या वाईट काळाच्या लोकामध्ये आपल्या चुकीमुळे आला आहात. काळ तुमचा दुरूपयोग करीत आहे. तुम्ही इथे दुःखी आहात. तुम्ही माझ्या म्हणण्यानुसार पूजा करा आणि आपल्या मूळ ठिकाणी सतलोकामध्ये जा, जिथे कोणतेही दुःख नाही. ही दुनिया माझ्यासाठी रडत आहे की, हे भगवान! आपण सर्व शक्तिमान, निर्माता, सर्वांचे पालनपोषण करणारे आहात. कृपया आम्हाला सुखी करा, आमचे दु:ख दूर करा. आम्ही तुमची भक्ती, पूजा करतो. तुम्ही आम्हाला दर्शन का देत नाहीत?

परंतु जेव्हा मी त्यांच्याजवळ जातो आणि त्यांना सांगतो की, मी भगवान आहे. तेव्हा ईश्वर निराकार आहे, ह्या निरर्थक समजूतीवर ठाम राहून माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. ह्या काळाने आमच्या मध्ये अज्ञानाची भिंत उभी केली आहे. या गैरसमजूतीला कोणी समजू शकत नाही.’

ह्या गैर समजूतीला समजण्यासाठी तिसऱ्या गोष्टीची आवश्यकता होती, ती म्हणजे सदगुरू, जी ईश्वराला आपल्या आत्म्यांशी जोडते.

संत रामपाल जी महाराज जी आज एकमात्र सदगुरू आहेत. ते स्वतः कबीर जींचे अवतार आहेत. ते तेच अध्यात्मिक ज्ञान सांगतात आणि त्याचप्रमाणे पूजा करण्याचा उपदेश देतात जे कबीर परमात्म्यांनी दिले. याचे प्रमाण ते पवित्र कबीर सागर मधून सुद्धा देतात.

कबीर परमेश्वर जी यांची आराधना सर्व प्रकारचे कष्ट दूर करते. संत रामपाल जी कबीर जींची शास्त्र आधारित उपासनेची पद्धत सांगतात‌. परीणामस्वरूप त्यांचे हजारो भक्त शेवटच्या क्षणी सुद्धा कॅन्सर आणि एड्स, ह्यांसारख्या घातक आजारातून बरे झाले आहेत. भूत आणि पित्रे त्यांच्या भक्तांचे कोणतेही नुकसान करू शकत नाहीत. त्यांचे प्रत्येक प्रकारचे कष्ट नष्ट होतात. संत रामपाल जींकडून दीक्षा घेतल्यामुळे, व्यक्तीचा अकाली मृत्यू होत नाही. फक्त भक्ती मर्यादा ठेवणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

संत रामपाल जी म्हणतात की, जर आपण त्यांनी सांगीतलेल्या सर्व नियमांचे पालन करीत आणि त्यांनी सांगीतलेल्या विधीप्रमाणे भक्ती करीत आहोत तर कॅन्सर काय कॅन्सरचा बापसुद्धा बरा होईल! त्यांच्या भक्तांची ही साक्ष, याचे जीवंत प्रमाण आहे. याचसाठी, यावेळेस, परमेश्वराला ओळखण्यात थोडा सुद्धा उशीर करू नका. त्यांचे ज्ञान स्वतः जाणून घ्या. संत रामपाल जी महाराज जी यांना शरण येऊन आपले कल्याण करा.

Latest articles

Hindi Diwas 2024: Honouring The Language That Unites India

Hindi Diwas is celebrated on 15 september every year in india. Know about the Date, Purpose, Significance, Events, Ceremonies, & Celebration of Hindi Diwas

World Suicide Prevention Day 2024: Human Life is Very Precious

Last Updated on 12 September 2024 IST: World Suicide Prevention Day is observed every...

संत रामपाल जी महाराज के अवतरण दिवस के भव्य तीन दिवसीय समारोह की विशेष रिपोर्ट

संत रामपाल जी महाराज के अवतरण दिवस के शुभ अवसर पर सतलोक आश्रम में...
spot_img

More like this

Hindi Diwas 2024: Honouring The Language That Unites India

Hindi Diwas is celebrated on 15 september every year in india. Know about the Date, Purpose, Significance, Events, Ceremonies, & Celebration of Hindi Diwas

World Suicide Prevention Day 2024: Human Life is Very Precious

Last Updated on 12 September 2024 IST: World Suicide Prevention Day is observed every...