December 3, 2024

तत्त्वदर्शी संत रामपाल जी महाराज का 74वा अवतरण (अवतार) दिवस 2024 [Marathi]

Published on

spot_img

जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो, तेव्हां-तेव्हां परमात्मा पृथ्वीवर स्वतः किंवा त्यांच्याद्वारे निवडलेल्या आत्म्याला अवतार रूपामध्ये प्रकट करतात.

भगवद्गीता अध्याय 4, श्लोक 7 आणि 8

यदा, यदा, हि, धर्मस्य, ग्लानि:, भवती, भारत, अभ्युत्थानम्, अधर्मस्य, तदा, आत्मानाम, सृजामि, अहम् ||
परित्राणाय, साधूनाम्, विनाशाय, च, दुष्कृताम्, धर्मसंस्थापनार्थाय, सम्भवामि, युगे, युगे ||

अर्थ: जेव्हां ही धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म वाढतो, तेव्हां मी (सर्वशक्तिमान) स्वतःच अथवा आपल्या अवताराला पाठवतो, जो पुण्यात्म्यांचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांना नष्ट करण्यासाठी आणि शास्त्र- आधारित भक्तीचा मार्ग प्रदान करण्यासाठी प्रकट होतो. मी आपले अवतार प्रत्येक युगामध्ये प्रगट करतो आणि दिव्य लीला करीत धर्माची स्थापना करतो.

सर्व शक्तिमान परमेश्वर, संपूर्ण ब्रम्हांडाचे निर्माते अमर लोकातुन या मृत्यु लोकामध्ये, वेळोवेळी अवतरीत होतात आणि यावेळी देखील महान संत रामपाल जी महाराजांच्या रूपामध्ये, दिव्य लीला करीत आहेत. 8 सप्टेंबर तो शुभ दिवस आहे, जेव्हा दरवर्षी संत रामपाल जी महाराज जी सर्व शक्तिमान कबीर साहेब जींचा अवतरण दिवस संपूर्ण विश्वात साजरा केला जातो.

Table of Contents

अवश्य वाचा: वार्षिक कार्यक्रम

या लेखामध्ये निम्नलिखित विषयांवर चर्चा केली जाईल.

  • 74 वा अवतरण (अवतार) दिवस 2024- संत रामपाल जी महाराज
  • अवतार चा अर्थ काय आहे? आध्यात्मिक गुरु संत रामपाल जी महाराज यांच्या विषयी माहिती.
  • अवतार संत रामपाल जी महाराजांचा एक मात्र उद्देश
  • अवतार संत रामपाल जी महाराज यांच्या विषयी भविष्यवाण्या.
  • अवतार दिवस 2024 कार्यक्रम: लाइव इवेंट.
  • अवतार संत रामपाल जी महाराज यांच्या विषयी पवित्र शास्त्रांमधुन पुरावा.
  • अवतार संत रामपाल जी महाराज यांच्या विषयी सर्व शक्तिमान कबीर जी यांची भविष्यवाणी.
  • सामाजिक उत्थानामध्ये संत रामपाल जी महाराज यांचे योगदान.
  • अवतरण (अवतार) दिवस कसा साजरा केला जातो?

74 वा अवतरण दिवस 2024- संत रामपाल जी महाराज

8 सप्टेंबर 2024- जगद्गुरु तत्त्वदर्शी संत रामपाल जी महाराजांचा 74 वा अवतरण दिवस आहे. पूर्ण ब्रह्म/परमेश्वर यांचा अवतार, ज्यांनी 17 फेब्रुवारी 1988 रोजी आपली आध्यात्मिक यात्रा सुरू केली आणि सामाजिक पाखंडवादाच्या बेड्या तोडून लाखो लोकांना अध्यात्माचा मार्ग दाखवला. त्यांच्याविषयी प्रसिद्ध भविष्यवेत्त्यांद्वारे शेवटचा मसीहा होण्याची भविष्यवाणी केली गेली आहे, जो सुवर्णयोग आणेल, ज्यांच्या नेतृत्वामध्ये भारत विश्व गुरु बनेल. हा लेख विश्वाचे उद्धार कर्ता संत रामपाल जी महाराज यांचे जिवंत विवरण प्रस्तुत करेल. म्हणूनच हा लेख शेवटपर्यंत अवश्य वाचा.

पुढे जात, आपण सर्व प्रथम अवतार चा अर्थ समजून घेऊ.

अवतार चा अर्थ काय आहे?

अवतार चा अर्थ आहे, धार्मिकतेच्या स्थापनेसाठी अमर लोकातून मृत्यू लोकांमध्ये प्रकट होणारा एक दिव्य पुरुष. म्हणजेच, या मृत्यूलोकावर शासन करणाऱ्या वाईट शक्तींपासून पीडित आत्म्यांचे रक्षण करणे. आध्यात्मिक पूर्णतेने सुसज्ज कुणा सर्वोच्च आत्म्याचा अवतार पृथ्वीवर येणे, एक नियमित घटना आहे, जी सर्व युगांमध्ये घडत असते. दैवी अवतरण, अर्थात अनंतामधून नश्वर संसारामध्ये सर्वोच्च आत्म्याचं प्रगट होणे.
संत रामपाल जी महाराज परम अक्षर ब्रह्म/सत्यपुरुष/ शब्द स्वरूपी राम/ अकालपुरुष यांचे तेच दिव्य अवतार आहेत, जे भक्तीचा खरा मार्ग प्रदान करतात, जो सर्व पवित्र शास्त्रांच्या अनुसार आहे, ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये सुवर्णयुगाची सुरुवात होईल, जसं की प्रसिद्ध भविष्यवेत्त्यांद्वारे भविष्यवाणी केली गेली आहे.

आध्यात्मिक गुरु संत रामपाल जी महाराज यांच्या विषयी माहिती

संत रामपाल जी महाराज सतलोक आश्रम, बरवाला, जिल्हा हिसार, हरियाणाचे संचालक आहेत, जे पवित्र शास्त्रांच्या अनुसार कबीर भगवानांचे खरे आध्यात्मिक ज्ञान प्रदान करीत आहेत. त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1951 रोजी भारताच्या हरियाणा राज्यामधील सोनीपत जिल्ह्यामध्ये, गोहाना तालुक्याच्या धनाना नामक एका छोट्या गावातील शेतकरी परिवारामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भगत नंदराम आणि त्यांच्या मातेचे नाव भगतमती इंद्रोदेवी आहे. संत रामपाल जी महाराज यांना चार अपत्ये आहेत. (वास्तविक, सर्व प्राणी, मनुष्य संत रामपालजी म्हणजेच, सर्व शक्तिमान कबीरजी यांचीच अपत्ये आहेत). भक्तांना नाम दीक्षा प्रदान करण्यापूर्वी ते सिंचन विभाग, हरियाणा सरकार मध्ये ज्युनियर इंजिनियर (अभियंता) या पदावर कार्यरत होते आणि 18 वर्षे सेवा केली.

त्यांची आध्यात्मिक यात्रा 17 फेब्रुवारी 1988 ला कबीर पंथी गुरु स्वामी रामदेवानंद जींचे शिष्य बनल्या नंतर सुरु झाली, ज्याला “बोध दिवस” च्या रूपात प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. (या दिवशी त्यांचा आध्यात्मिक जन्म झाला ) स्वामी रामदेवानंद जींनी वर्ष 1994 मध्ये त्यांना आपला उत्तराधिकारी हे म्हणत निवडला की, “या संपुर्ण जगात आपल्या सारखा कुणी दूसरा संत नाहीं होणार” संत रामपाल जी महाराज जींना सत्य आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाले, तेव्हा पासून त्यांचे जीवन पुर्णतः बदलून गेले. त्यांनी आपल्या नौकरी चा राजीनामा दिला ज्याला हरियाणा सरकार ने त्याग पत्र दिनांक 16/5/2000, संख्या 3492.3500 द्वारा स्वीकार केले गेले. त्यांनी 1994 – 1998 पर्यंत घरी-घरी जाऊन आध्यात्मिक प्रवचन दिले. लवकरच हजारों भक्तांनी शरण ग्रहण केली आणि वर्ष 1999 मध्ये हरियाणा च्या रोहतक जिल्ह्याच्या करोंथा मध्ये आश्रमाची स्थापना केली गेली. वर्तमानात, ते पूर्णतः जगभरात भक्ति च्या खऱ्या मार्गाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी समर्पित आहे ज्याच्या फलस्वरूप आत्म्यांना मोक्षाची प्राप्ति होईल.

सूक्ष्मवेदात म्हणजे परमात्मा कबीर साहेबजीं च्या अमृत वाणी मध्ये उल्लेख केला आहे :-

जो मम संत सत उपदेश दृढ़ावै (बतावै), वाके संग सभि राड़ बढ़ावै।
या सब संत महंतन की करणी, धर्मदास मैं तो से वर्णी।।

विभिन्न नकली धर्मगुरू, समकालीन संत आणि महंतां करवी पावलो पावली कठिनाईंचा सामना करण्या उपरोक्ष पूर्ण मानव जातिच्या कल्याणाच्या उद्देशाने संत रामपाल जी महाराज जनते पर्यंत पोहोचणे आणि सत्य भक्ति करणार्या प्रत्येक भक्तच्या ह्रदयात जागा बणवण्यात सफल होत आहे अणि त्यांचे प्रत्येक भक्त प्रतिदिन लाभ प्राप्त करत आहेत. भक्तांना संत रामपाल जी महाराजींच्या खर्या आध्यात्मिक ज्ञानाला एकण्या पासून रोखण्या साठी नकली बिकाऊ मीडिया आणि धार्मिक गुरुंनी त्यांच्या नावाला चुकीच्या पद्धति ने उधळले आणि जनते मध्ये एक नकारात्मक प्रतिमा बनवण्याचा प्रयास केला. परंतु त्यांच्या द्वारा प्रदान केल्या गेलेल्या सत्य भक्ति ने जगभरात त्या लाखों भक्तांच्या जीवनाला बदलून टाकले आहे, जे दलदली च्या आयुषातून निघून आता सुख आणि आरामा चे आयुष्य व्यतीत करत आहे, मग समस्या लोकांच्या स्वास्थाच्या सम्बंधित असो, वित्तीय अस्थिरता असो, पारिवारिक बंधन असो संत रामपाल जींनी सर्व भक्तांच्या दुखांना दूर केले आहे आणि या प्रकारे, नकली गुरुंचा त्यांच्या प्रति द्वेष आणि अविश्वास पसरवण्याचे सर्व प्रयास व्यर्थ झाले. केवळ एक पूर्ण संत जो सर्वशक्तिमान परमेश्वराचा प्रतिनिधि असतो आणि ज्यांच्या पाशी पवित्र शास्त्रांमध्ये प्रमाणित ज्ञान असते त्यांच्यातच हे गुण असतात.

पूर्ण संत रामपाल जी महाराजांच्या ओळखी साठी सर्वांनी आवश्य वाचले पाहीजे “पूर्ण संतांची ओळख”

अवतार संत रामपाल जी महाराज यांचा एकमेव उद्देश
कसाई काल ब्रम्ह च्या जाळा मध्ये आत्मां अडकलेल्या आहेत. काल ब्रम्ह च्या जाळ्यात आत्म्या कश्या अडकल्या आणि अनेक युगा पासून त्यांना रात्रंदिवस छळल्या जात आहे. सर्वशक्तिमान कबीर उद्धारकर्ता आहेत ते आपल्या प्रिय आत्मांना काल कसाई याच्या जाळ्यातुन सोडवण्याच्या उद्देशाने प्रत्येक युगात अवतार घेतात.
सुक्ष्मवेदात याचे प्रमाण आहे.


सतयुग में सत सुकृत कह टेरा,त्रेता नाम मुनिंद्र मेरा।
द्वापर में करुणामय कहाया, कलयुग नाम कबीर धराया।।


सर्वशक्तिमान परमेश्वर पुन्हा अवतरीत झाले आहेत आणि संत रामपाल जी महाराज यांच्या रुपाने दिव्य लीला करत आहेत. त्यांचा एकमेव उद्देश संपूर्ण मानव जातीचे कल्याण करणे आहे. त्यांनी सत्य आध्यात्मिक ज्ञान देऊन पीडित आत्मांना काल च्या जाळातुन सोडविण्यासाठी अवतार घेतलेला आहे. सृष्टी रचनेचे गूढ रहस्य प्रमाणा सह सांगितले आहे कारण आत्मा नेहमी साठी सुखी होऊन मुळ निवासस्थानी सचखंड/सतलोक मध्ये परत जावी. तिथे गेल्यावर जन्म आणि मृत्यू चे चक्र कायमचं समाप्त होईल आणि आत्मा ह्या नाशवंत जगात पुन्हा कधीच परत येणार नाहीत. संत रामपाल जी यांचे अध्यात्मिक ज्ञान अद्वितीय आणि अभुतपुर्व आहे ज्याचे पालन केल्याने भक्तांना सर्व सुख प्राप्त होतात. जसे आर्थिक लाभ, शारीरिक स्वास्थ्य लाभ, अध्यात्मिक ज्ञानात वाढ तसेच आयुष्य वृद्धी सुद्धा होते.


कबीर परमेश्वर आपल्या अमृत वाणी मध्ये म्हणतात की:

मानुष जनम दुर्लभ है, ये मिले ना बारंबार।
जैसे तरुवर से पत्ता टूट गिरे, बहुर ना लगता डार।।


मानव जन्माचा एक मात्र उद्देश ब्रम्हांड निर्माता परम अक्षर ब्रह्म यांची सत्य साधना करून मोक्ष प्राप्त करणे आहे. यासाठी ईश्वर प्रेमी आत्मांना विनंती आहे की संत रामपाल जी महाराज यांचे अध्यात्मिक सत्संग ऐकून त्यांच्या द्वारे दिली जाणारी सत भक्ती, नामदीक्षा घेऊन आपले कल्याण करून घ्यावे.
अवश्य वाचा “संत रामपाल जी महाराज यांची जीवनगाथा”

अवतार संत रामपाल जी महाराज यांच्या विषयी भविष्यवाण्या

महान भविष्यकार फ्लोरेंस, इंग्लैंड च्या केयरो, जीन डिक्सन, श्रीमान चार्ल्स क्लार्क आणि अमेरिकेचे श्री एंडरसन, हाॅलैंड चे श्री वेजिलेंटिन, श्री जेरार्ड क्राइस, हंगरी चे भविष्यकार बोरिस्का, फ्रांसचे डाॅ. जुल्वोरोन, प्रसिद्ध फ्रांसीसी भविष्यकार नास्त्रेदमस, इस्त्रायल चे प्रोफेसर हरारे, नाॅर्वेचे श्री आनंदाचार्य, जयगुरुदेव पंथाचे “श्री तुलसीदास साहेब मथुरावाले” आणि अनेक इतर भविष्यकारांनी महान संत रामपाल जी महाराज यांच्या विषयी भविष्यवाणी केली आहे कि, तो अवतार ‘विश्वामध्ये एक नवीन सभ्यता’ आणणार, जी सम्पूर्ण विश्वामध्ये पसरणार “संत रामपाल जी महाराज यांच्या समर्थनासाठी अन्य भविष्यवाण्या” चारहि बाजूकडे शांति आणि बंधुभाव होणार आणि ती नवीन सभ्यता, अध्यात्मावर आधारित असणार, जी भारतातील एका ग्रामीण परिवारामध्ये जन्म घेतलेल्या एका महान अध्यात्मिक नेत्याच्या नेतृत्वामध्ये उत्पन्न होईल. महान आध्यात्मिक नेत्याच्या जवळ सामान्य लोकांची खूप मोठी संख्या असेल, जी भौतिकवादाला, आध्यात्मिकवादा मध्ये बदलविणार. महान आध्यात्मिक नेता (अवतार संत रामपाल जी महाराज) यांच्या मार्गदर्शनामध्ये भारत धार्मिक, औद्योगिक आणि आर्थिक दृष्टितून जगाचे नेतृत्व करणार आणि सर्व जगामध्ये भक्तांना, त्यांच्या द्वारे सागितलेली भक्ति विधिच स्वीकार्य होणार.

नास्त्रेदमस यांनी भविष्यवाणी केली आहे कि, महान शायरन (तत्वदर्शी संत); हिंदू समूदायाशी संबंधित मध्यम वयाचा (55-60 वर्ष) सन् 2006 मध्ये प्रकाशामध्ये येईल, जो सर्व पृथ्वीवर स्वर्ण युगाचा प्रारंभ करणार आणि ज्याची प्रसिद्धि आकाशापेक्षाहि दूर असणार. ते आत्म्यांना शैतानांपासून मुक्त करणार आणि त्यांना सर्वेच्च शांति प्राप्त करून देणार.


अवश्य वाचा “संत रामपाल जींच्या बाबतीत नास्त्रोदमस ची भविष्यवाणी.”

पहा संत रामपाल जी महाराज जी यांच्या 74 व्या अवतरण दिवस कार्यक्रमाचे थेट प्रसारण

जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांच्या अवतरण दिवसा निमित्त, सतलोक आश्रम धनाना धाम सोनीपत (हरियाणा), सतलोक आश्रम भिवानी (हरियाणा), सतलोक आश्रम कुरुक्षेत्र (हरियाणा), सतलोक आश्रम शामली (उत्तरप्रदेश), सतलोक आश्रम खमाणों (पंजाब), सतलोक आश्रम धुरी (पंजाब), सतलोक आश्रम बैतुल (मध्य प्रदेश), सतलोक आश्रम सोजत (राजस्थान), सतलोक आश्रम धनुषा (नेपाल) एकूण 9 आश्रमांमध्ये 6 ते 8 सप्टेंबर 2024 ला अखंड पाठ प्रकाश, विशाल भंडारा, विना हुंडा विवाह, रक्तदान शिबिर, विशाल सत्संग समारोह आणि आध्यात्मिक प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे. ज्यामध्ये आपण सर्व बंधु-भगिनींना हात जोडून निवेदन आहे कि, आपण संत रामपाल जी महाराज यांच्या अवतरण दिवसानिमित्त, आपल्या परिवार, नातेवाईक, सगे संबंधितांबरोबर आश्रमामध्ये अवश्य या आणि आदि सनातन धर्म व मानव धर्माच्या पुनरुत्थाना चे साक्षीदार व्हा.

या भव्य कार्यक्रमाचे थेट प्रसारण 08 सप्टेंबर ला सकाळी 09.15 वाजल्यापासून साधना TV. सोबतच, या विशेष कार्यक्रमाचे थेट प्रसारण, आपण आमच्या सोशल मीडिया Platform वर सुद्धा पाहू शकता, जी खाली आहे:-

  • Facebook page:- spiritual Leader Sant Rampal Ji Maharaj
  • Youtube:- Sant Rampal Ji Maharaj
  • Twitter:- @SantRampalJiM

अवतार संत रामपाल जी महाराज यांच्याबद्दल पवित्र धर्मग्रंथातील पुरावा

संत रामपाल जी महाराज जी हे कबीर परमेश्वर जींचे अवतार आहेत, ज्यांच्याबद्दल पवित्र धर्मग्रंथ, पवित्र वेद (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद) श्रीमद्भगवद्गीता – अध्याय 4 श्लोक 32, 34 मध्ये परिपूर्ण परमेश्वराची संकल्पना आहे. अध्याय 15 श्लोक 1-4, आणि अध्याय 17 श्लोक 23. पवित्र कुराण शरीफ सर्वशक्तिमान अविनाशी देव (अल्लाह कबीर) कुराण शरीफ (इस्लाम) सूरत – फुरकान 25:52-59, पवित्र बायबल, पवित्र श्री गुरु ग्रंथ साहिब पुरेसा पुरावा देतात. भाई बाले वाली जन्म साखीमध्ये असे नमूद केले आहे की सर्वोच्च संत जाट समाजातील असतील आणि ते बरवाला, हरियाणातून आध्यात्मिक प्रवचन देतील (पूर्वी हरियाणा प्रांत पंजाबमध्येच होता). हे सर्व पुरावे संत रामपालजी महाराजजींवर अगदी तंतोतंत बसतात.

अवतार संत रामपाल जी महाराज बद्दल सर्वशक्तिमान कबीर साहेब जींची भविष्यवाणी:

संदर्भ: पवित्र कबीर सागर, अध्याय बोध सागर, पृष्ठ 134 आणि 171


पवित्र कबीर सागर म्हणजेच सुक्ष्म वेद या सर्वशक्तिमान कबीर साहेबजींचे अमृत वाणीमध्ये नमूद केले आहे की जेव्हा कलियुग 5505 वर्षे पूर्ण होईल तेव्हा त्यांचे 13 वे वंश खरे आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठी आणि अशास्त्रीय भक्ती पद्धती आणि ज्ञान आणि खोट्या धार्मिक प्रथा नष्ट करण्यासाठी येतील. शांतता प्रस्थापित करतील. ते साधकांना खरे मोक्ष मंत्र प्रदान करण्यासाठी अधिकृत असतील (पुरावा भगवद्गीता अध्याय 17 श्लोक 23). सर्व आत्मे वाईटाचा त्याग करतील आणि सद्गुणी बनतील आणि भगवान कबीर साहेब जींच्या अवताराचा गौरव करतील. 1997 मध्ये कलियुगाने 5505 वर्षे पूर्ण केली आणि त्याच वर्षी सर्वशक्तिमान कबीर साहेब जीं सर्व धर्मांनुसार त्यांचे अमर ज्ञान प्रमाणित ज्ञान महान संत रामपाल जी महाराजजी यांना भेटून दिले तसेच, त्यांना पवित्र ईश्वर-प्रेमळ आत्म्यांना नाम दीक्षा देण्याची परवानगी दिली.


याचा पुरावा परम भगवान कबीर साहेब जींच्या अमृत वाणीत आहे.


पांच सहस्र अरु पांचसौ, जब कलयुग बीत जाए |
महापुरुष फरमान तब, जग तारन को आए ||


ते महापुरुष दुसरा कोणी नसून सतपुरुष/भगवान कबीर साहेब जी यांचे अवतार संत रामपाल जी महाराज जी आहेत, ज्यांचा अवतार दिन दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

संत रामपाल जी महाराज जी यांची सामाजिक उत्थानातील भूमिका

अध्यात्मिक गुरू संत रामपाल जी महाराज यांनी समाजात पसरलेल्या हुंड्यासारख्या कुप्रथेचे उच्चाटन करण्याबरोबरच सामाजिक उत्थानासाठी मोठे योगदान दिले आहे. संत रामपालजी महाराजांचे शिष्य लग्नात हुंडा देत नाहीत आणि घेत नाहीत. 17-मिनिटांची रमेणी पाठ केली जाते जी नवविवाहित जोडप्याला अतूट बंधनात बांधते. अमली पदार्थांचे सेवन, लाचखोरी, भ्रष्टाचार, स्त्री भ्रूणहत्या यासारख्या वाईट सामाजिक प्रथा संत रामपालजी महाराजांनी दिलेल्या खऱ्या अध्यात्मिक ज्ञानाने नष्ट केल्या आहेत. संत रामपाल जी महाराज जींचा कोणताही शिष्य आता मादक पदार्थांचे सेवन करत नाही किंवा वाईट वर्तन करत नाही आणि केवळ शास्त्राधारित खरी भक्ती करतो कारण त्यांना हे समजले आहे की मानव जन्माचा एकमात्र उद्देश शास्त्रावर आधारित खरी भक्ती करणे आहे. होय आणि मोक्ष प्राप्त करणे. संत रामपालजी महाराज जींनी समाजात प्रचलित असलेल्या प्रत्येक धार्मिक ढोंगीपणाचा पर्दाफाश केला आणि खरा भक्तीचा मार्ग दाखवला ज्याद्वारे लाखो अनुयायी समृद्ध जीवन जगत आहेत.

अवतरण (अवतार) दिवस कसा साजरा केला जात आहे?

8 सप्टेंबर 2024 संत रामपाल जी महाराज यांचा 74 वा अवतरण दिवस आहे. हा शुभ दिवस जगभर साजरा केला जात आहे, जेथे संत रामपाल जी महाराज यांचे द्वारे आध्यात्मिक प्रवचनांच्या माध्यमातून अमृत वाणी चा वर्षाव केला जात आहे, ज्यांच्या कृपेने ‘भक्त आत्म्यांचे वर्तमान जीवन व मृत्यु उपरांत’ जीवनसुद्धा सरळ होऊन जात आहे. ते सर्व ख-या भक्तांना काळ जाळ्या पासून मुक्त करण्याची गारंटी देत आहेत, जे त्यांच्या द्वारे निर्धारित भक्तिच्या नियमामध्ये राहून भक्ति करीत आहेत अवतरण दिवसानिमित्त संत गरीबदास जींच्या पवित्र सदग्रंथ साहेबचा 3-5 दिवसांचा पाठ केला जात आहे. भव्य सामुदायिक भोजन-भंडारा (मुफ्त आणि स्वादिष्ट) याचे आयोजन केले जात आहे, जेथे प्रत्येक कोणीहि, तो कोणत्याहि जाति, पंथ, धर्माचा असू दे, भोजनाचा आनंद घेऊ शकतो. रक्तदान, अंगदान, शिविर आयोजित केले जात आहे, सोबतच विना हुंडा विवाह म्हणजेच रमैणी चे सुद्धा आयोजन केले जात आहे.

संत रामपाल जी महाराज जी द्वारा केले जाणारे समाज सुधारण्याचे प्रशंसनीय कार्य. चला, तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज जी द्वारा एक महान समाज सुधारकाच्या रूपामध्ये केले जाणारे अद्भुत कार्यांच्या बाबतीत जाणून घेऊ या. संत रामपाल जी महाराज जी यांचे मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

समाजापासून सर्व प्रकारच्या नशेला दूर करणे

जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज समाज सुधारकाच्या रूपामध्ये अद्भुत कार्य करीत आहेत. नशा समाजामध्ये खोलवर रुजल्या गेला आहे. तसेच सरकार दारु, धूम्रपान, ड्रग्स इत्यादि नशील्या पदार्थांचे सेवनाच्या या व्यसनाला आंशिक रूपामध्ये नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु लाखों रुपये खर्च केल्यानंतरहि त्यांच्या सर्व योजना असफल होत आहेत. असे यासाठी कि, सरकारला खूप मोठे उत्पन्न सुद्धा लोकांच्या नशा करण्यामुळे मिळते. लोकांना तत्वज्ञान म्हणजेच आध्यात्मिक ज्ञान नाही, जर झाले तर, तो नशा करणारच नाही, पण त्याला हात सुद्धा लावणार नाही. संत रामपाल जी महाराज जी यांचे शिष्य ख-या आध्यात्मिक ज्ञानाला ओळखून आहे आणि नशिल्या पदार्थांचे सेवनाच्या दुष्परिणामाला समजून आहेत. नशा, मोक्ष प्राप्ति मध्ये एक मोठा अडथळा आहे आणि तत्वदर्शी संत चा प्रत्येक भक्त या तथ्याला समजून आहे कि, मानव जन्माचा एकमात्र उद्देश, सत भक्ति करीतच मोक्ष प्राप्त करणे आहे. यासाठी ते, जीवन बरबाद करणा-या व्यसनांनी प्रभावित नाही होत. आपणा सर्वांना प्रार्थना आहे कि, नशा करणे सोडून द्या आणि जर नाही सोडू शकले तर, संत रामपाल जी महाराज जी यांची मदत जरुर घ्या.

सतभक्ति प्रदान करुन विश्वाला मोक्ष प्रदान करणे

काळाच्या दुनियेमध्ये राहणारे सर्व प्राणी भ्रमित झाले आहेत आणि मनामध्ये येईल तशी पूजा करून आपले जीवन नष्ट करीत आहेत, कारण कि, शास्त्र विरूद्ध पूजा केल्यामुळे, साधकाला कोणताहि लाभ मिळत नाही. संत रामपाल जी समाज सुधारकाच्या रूपामध्ये, शास्त्रावर आधारित उपासना करवून, लोकांच्या जीवनामध्ये बदल / चमत्कार करीत आहेत ज्यामुळे असंभव वाटणा-या गोष्टी सुद्धा सहज संभव होत आहेत आणि साधकांना असंख्य लाभ मिळत आहेत. भक्तांचा दिवसेंदिवस त्यांच्यावरचा विश्वास दृढ होत आहे. त्यांचे लक्ष्य, ख-या आध्यात्मिक ज्ञानाला पूर्ण जगामध्ये पसरविणे आहे, कारण कि, ते कसाई ब्रम्ह काळाच्या जाळ्यामध्ये फसलेल्या सर्व भ्रमित आत्म्यांना मुक्त करवून, त्यांचे खरे घर शाश्वत स्थान सतलोकांमध्ये पोहचविण्याची इच्छा करतात.

समाजातून जातिगत भेदभाव मिटविणे

ब्रम्ह काळ च्या 21 ब्रम्हांडामध्ये राहणारे सर्व प्राणी एकाच ईश्वराची संतान आहे. अज्ञानतेच्या कारणाने आम्ही विभिन्न धर्म, जाति आणि पंथांमध्ये विभाजित आहोत आणि आपल्या सुखदायी परम पिता परमात्म्याला विसरलो आहोत. महान समाज सुधारक संत रामपाल जी महाराज जी जगातल्या लोकांना आध्यात्मिक प्रवचनाच्या माध्यमातून एकजूट करीत आहेत आणि मानव समाजाला योग्य आध्यात्मिक मार्ग दाखवित आहेत तसेच आपल्या ज्ञानाने, त्यांच्या आत्म्याला शुध्द करीत आहेत, ज्यामुळे त्यांचे अनुयायी चांगल्याप्रकारे समजून चुकले आहेत कि, आम्ही सर्व एकाच पित्याची लेकरे आहोत, यामुळे धर्म किंवा जातीच्या आधारावर, कोणाबरोबर भेदभाव नाही केला पाहिजे.

तरूणांमध्ये नैतिक आणि आध्यात्मिक जागृति आणणे

आजच्या दिवशी प्रचलित शिक्षण प्रणाली, तरूणांना अध्यात्म पासून दूर नेत आहे. तरूणांचा एकमात्र उद्देश, भौतिक लाभ मिळविणे आहे आणि करोडपति होणे आहे. तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज जी एकमात्र समाज सुधारकाच्या रूपामध्ये आपल्या आध्यात्मिक प्रवचनांच्या माध्यमातून, तरूणांमध्ये उच्च नैतिक मूल्य आत्मसात होत आहेत, ज्यामुळे तरूण पिढी समजून घेत आहे कि, त्यांचा मानव जन्म अध्यातिक कीमती आहे आणि त्याला केवळ भौतिक धन संचय करण्यामध्ये बरबाद नाही केला पाहिजे, परंतु त्यांना सतभक्ति करण्याचे ध्येय्य ठेवले पाहिजे, जे नंतर त्यांच्या सोबत जाईल. काळाच्या जगामध्ये जगण्यासाठी आवश्यक वस्तुंच्या पूर्ततेसाठी प्रयत्नांबरोबरच त्यांनी मानव जन्माचा एकमात्र उद्देश नाही विसरला पाहिजे, कि जो सतभक्ति करणे आणि मोक्ष प्राप्त करणे आहे. संत रामपाल जी आपल्या आध्यात्मिक प्रवचनांच्या माध्यमातून प्रदान करीत आहेत.

हुंड्यासारख्या वाईट गोष्टी समाजातून नष्ट करणे

मुली प्रत्येक कुटुंबासाठी देवाचा आशीर्वाद वरदानच आहेत. आई-वडिलांसाठी मुलगी ही त्यांच्या मुलाइतकीच मौल्यवान असते. परंतु कलयुगाच्या चुकीच्या परंपरा आणि हुंड्याच्या प्रथेमुळे, लोकं या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत आहेत आणि ते मुलीला ओझे मानतात कारण त्यांना तिच्या लग्नावर जास्त खर्च करावा लागतो. समाजात प्रचलित असलेली हुंड्याची ही दुष्ट प्रथा त्या कुटुंबांसाठी, विशेषत: आपल्या मुलीच्या लग्नाचा मोठा खर्च परवडत नसलेल्या गरीब कुटुंबांसाठी शाप ठरली आहे. थोर समाजसुधारक संत रामपाल जी महाराज जी यांनी समाजातून ही दुष्टाई नष्ट करण्याचे अद्भूत कार्य केले आहे. त्यांचे शिष्य लग्नात हुंडा देत नाहीत आणि घेत नाहीत. रमेणी नावाच्या लग्नात 17 मिनिटांत 33 कोटी देवांना आवाहन करून अतिशय साध्या पद्धतीने लग्न केले जाते. लग्नात थाटामाट आणि दिखाऊपणा नसतो आणि वधू आणि वरांना आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी, चांगले कर्म करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी परमात्माचा आशीर्वाद असतो.

समाजात शांतता आणि बंधुभाव प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार

आत्ताचे काळाचे लोक म्हणजे कलयुग हे जग दु:खाने भरलेले आहे. येथे कोणताही प्राणी सुखी नाही. सगळीकडे अराजकता आहे. लोक छोटय़ा छोटय़ा गोष्टींवर लढायला तयार असतात. थोर समाजसुधारक संत रामपाल जी महाराज आपल्या सत्संगातून शांतता आणि बंधुतेचा संदेश जगभर पसरवत आहेत आणि एक सशक्त समाज निर्माण करत आहेत.

सामाजिक वाईट गोष्टी दूर करून स्वच्छ समाज

हुंडाबळी, लाचखोरी, भ्रष्टाचार, अंमली पदार्थांचे सेवन, व्यभिचार यांसारख्या अनेक सामाजिक वाईट गोष्टी समाजात प्रचलित आहेत. अज्ञानामुळे लोक या सर्व चुकीच्या गोष्टी करतात. महान समाजसुधारक संत रामपालजी महाराज जी हे सत्य आध्यात्मिक ज्ञान देऊन उच्च सामाजिक आणि नैतिक मूल्ये लोकांमध्ये रुजवत आहेत ज्याने सर्व सामाजिक दुष्कृत्ये नष्ट होत आहेत. आणि त्यांचे शिष्य सर्व वाईटांपासून मुक्त जीवन जगत आहेत. संपूर्ण जगाने सर्व सामाजिक दुष्कृत्ये सोडून साधे आणि आनंदी जीवन जगावे हा त्यांचा उद्देश आहे. महान तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज जी यांच्या मार्गदर्शनाखाली साधल्या जाणार्‍या खर्‍या अध्यात्मिक ज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील हा मोठा बदल शक्य होत आहे, आणि होत ही आहे.

*भ्रष्टाचार मुळापासून नष्ट करणे *

समाजातील भ्रष्टाचाराची मुळे खूप खोलवर आहेत. तो दीमक सारखा पसरला आहे जो हळूहळू समाजाला पोकळ करत आहे. खून, चोरी, लाचखोरी, भेसळ, इतरांचे हक्क मारणे, इत्यादी सर्व भ्रष्टाचार अज्ञानामुळे होत आहेत. भ्रष्टाचार वाढवण्यात राजकारणी आणि बॉलीवूडचा मोठा वाटा आहे. थोर समाजसुधारक संत रामपालजी महाराज जी यांचे शिष्य ना चित्रपट पाहतात, संगीत वाजवत नाहीत, नृत्य करत नाहीत किंवा राजकारणात भाग घेत नाहीत. उच्च सामाजिक आणि नैतिक मूल्यांसह ते साधे जीवन जगतात आणि कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारापासून दूर राहतात.

समाजातून पाखांडवाद दूर करणे

थोर समाजसुधारक संत रामपाल जी महाराज जी यांचे शिष्य नम्र आणि उदार आहेत. ते शुद्ध अंतःकरणाचे आहेत. ते कोणाचीही फसवणूक करत नाहीत कारण त्यांना असे समजले आहे की, असे कार्य भगवंताला आवडत नाहीत आणि त्यांचे एकमेव ध्येय आहे परमात्मा प्राप्त करणे. संतजींचे सर्व शिष्य सर्व प्रकारच्या ढोंगीपणापासून दूर राहतात मग ते धार्मिक असोत वा सामाजिक. ते सर्व पवित्र धर्मग्रंथात सांगितलेल्या पद्धतीनुसार उपासना करतात आणि उपासनेच्या विहित नियमांचे धार्मिकपणे पालन ही करतात. संत रामपाल जी महाराज जी यांच्या अध्यात्मिक प्रवचनातून प्रसारित होत असलेल्या खऱ्या अध्यात्मिक ज्ञानाचा हा परिणाम आहे.

निष्कर्ष

अच्छे दिन पाछे गए, सतगुरु से किया न हेत |
अब पछतावा क्या करे,, जब चिड़िया चुग गई खेत ||


सर्व वाचकांना विनंती आहे की, जगाचे रक्षणकर्ते संत रामपालजी महाराज जी यांना वेळीच ओळखावे, अन्यथा नंतर पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरणार नाही.


संत रामपालजी महाराज म्हणतात, जीव हमारी जाति हैं, मानव धर्म हमारा।
हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, धर्म नहीं कोई न्यारा।।


विश्वविजेते संत रामपाल जी महाराज जी हे परमेश्वर कबीर साहेब जीं चे अवतार आहेत आणि त्यांनी अज्ञान दूर करण्यासाठी आणि कालच्या म्हणजे कसाईच्या जाळ्यात अडकलेल्या आपल्या प्रिय आत्म्यांना मुक्त करण्यासाठी आणि सर्वत्र पसरलेल्या अधर्माचा नाश करण्यासाठी अवतार घेतला आहे. आपण सर्वांनी त्यांच्याकडून नामदिक्षा घ्या आणि आपला मनुष्यजन्म श्रेष्ठ करून मोक्ष मिळवा, परमेश्वराची प्राप्ती करा.

Latest articles

Indian Navy Day 2024: Know About the ‘Operation Triumph’ Launched by Indian Navy 50 Years Ago

Last Updated on 3 December 2024 IST: Indian Navy Day 2024: Indian Navy Day,...

मानबसा गुरुवार (Manabasa Gurubar), जानिए सुख समृद्धि का शास्त्रानुकूल सहज मार्ग

मानबसा गुरुवार (Manabasa Gurubar), एक कृषि त्योहार है जो ओडिशा प्रान्त में मनाया जाता...

World AIDS Day 2024: Sat-Bhakti can Cure HIV / AIDS

Last Updated on 1 December 2024: World AIDS Day is commemorated on December 1...
spot_img

More like this

Indian Navy Day 2024: Know About the ‘Operation Triumph’ Launched by Indian Navy 50 Years Ago

Last Updated on 3 December 2024 IST: Indian Navy Day 2024: Indian Navy Day,...

मानबसा गुरुवार (Manabasa Gurubar), जानिए सुख समृद्धि का शास्त्रानुकूल सहज मार्ग

मानबसा गुरुवार (Manabasa Gurubar), एक कृषि त्योहार है जो ओडिशा प्रान्त में मनाया जाता...