HomeBlogsसंत गरीब दास जी महाराजांचा जीवन परिचय

संत गरीब दास जी महाराजांचा जीवन परिचय [Marathi]

Date:

Hindiঅসমীয়াবাংলাಕನ್ನಡमराठीગુજરાતી

संत गरीबदास जींचा जन्म गाव छुड़ानी जिल्हा झज्जर प्रांत- हरियाणा मध्ये सन् 1717 (विक्रम संवत् 1774) मध्ये झाला. छुड़ानी गावामध्ये गरीबदास महाराज जींचे आजोळ आहे. ते करौंथा गावाचे (जिल्हा-रोहतक, हरियाणा) रहिवासी, धनखड़ गोत्राचे होते. त्यांचे वडील श्री बलराम जींचा विवाह छुड़ानी गावातील श्री शिवलाल सिहाग यांची कन्या राणी देवी सोबत झाला होता. श्री शिवलाल यांना पुत्र नव्हता म्हणून श्री बलराम जींना घरजावई केलं होतं. छुड़ानी गावात राहुन 12 वर्षे झाली तेव्हा संत गरीबदास महाराज जींचा जन्म छुड़ानी गावात झाला. श्री शिवलाल जींकडे 2500 बीघे (मोठा बीघा जो वर्तमानातील बीघ्याच्या 2.75 पट मोठा असतो) जमीन होती. जी सध्या वर्तमानात 1400 एकर जमीन होते. (2500×2.75/5 1375 एकर) त्या संपूर्ण जमिनीचे वारस श्री बलराम जी झाले तसेच त्यांच्या पश्चात् त्यांचे एकुलते एक पुत्र संत गरीबदास जी त्या संपूर्ण जमीनीचे वारस झाले. त्याकाळी पशुधन खूप जोपासलं जायचं. श्री बलराम जींनी जवळपास दीडशे गाई राखल्या होत्या. त्यांना चारायला नेण्यासाठी आपला पुत्र गरीबदास जी सोबत इतर अनेक चारायला नेणारे (पाली = गवळी) मजुरीवर घेतले होते, ते देखील गाईंना शेतांमध्ये चरण्यासाठी घेऊन जात असत.

10 वर्षाच्या बालक गरीबदास जी, यांची पूर्ण परमात्मा कबीर साहेब जी, यांच्याशी मुलाखत

ज्या वेळी संत गरीबदास जी 10 वर्षे वयाचे झाले, ते गायींना चरण्यासाठी इतर गवळ्यांसोबत नला नामक शेतात गेले होते. फाल्गुन महिन्याच्या शुद्ध द्वादशीला सकाळी जवळपास 10 वाजता परम अक्षर ब्रह्म एका जिंदा महात्म्याच्या वेशात भेटले. कबलाना गावाच्या सीमेला लागून नला शेत आहे. सर्व गवळी एका जांडी च्या झाडाखाली बसून जेवण करीत होते.

हे झाड कबलाना वरून छुडाणी ला जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर होते. वर्तमानात सरकार ने त्या वाटेवर पक्का रस्ता बांधला आहे. परमेश्वर जी सतलोका वरुन झाडापासून काही अंतरावर उतरुन कबलानाच्या दिशेने छुड़ाणीला जाऊ लागले. जेव्हा गवळ्यांच्या जवळ आले, तर गवळ्यांनी म्हटलं, बाबा जी आदेश!  राम राम! परमेश्वर जी म्हणाले राम राम! गवळी म्हणाले की बाबा जी! जेवण घ्या. परमेश्वर जी म्हणाले की जेवण तर मी आपल्या गावावरूनच करुन निघालो आहे. गवळी म्हणाले की महाराज! जेवण नाही करणार तर दूध तरी अवश्य घ्यावेच लागेल. आम्ही पाहुण्यांना काहीही न खाता-पिता जाऊ देत नाही. परमेश्वर म्हणाले की मला दूध द्या आणि ऐका! मी कुमारी गाईचं दूध पितो. जे वयस्कर गुराखी (गवळी) होते, ते म्हणाले, की तुम्ही तर विनोद करीत आहात. आपली दूध पिण्याची नियत नाही आहे. काय कुमारी गाय कधी दूध देते? पुन्हा परमेश्वर म्हणाले, की मी कुमारी गाईचे दूध घेईल.

परमेश्वर कबीर जी द्वारा संत गरीबदास जी तसेच इतर गुराख्यांच्या समोर कुवारी गाईचे दूध पिणे

बालक गरीबदासाने एक कालवड जिचे वय दीड वर्षे होते, जिंदा बाबा च्या जवळ आणून उभी केली. परमात्मांनी कालवडीच्या कंबरेवर आशीर्वाद रुपी हात ठेवला. कालवडीचे स्तन मोठे मोठे झाले. जवळपास पाच किलोग्रॅम क्षमतेचं मातीचे एक भांडं (एक पात्र) कालवडीच्या स्तनांखाली ठेवलं. स्तनांमधून आपोआप दूध येऊ लागले. मातीचे पात्र भरल्यानंतर दूध येणं बंद झालं. अगोदर जिंदा बाबा दूध प्यायले, शिल्लक राहिलेलं दूध इतर गुराख्यांना (गवळ्यांना) प्यायला सांगितले, तर वयस्कर गुराखी (जे संख्येमध्ये दहा-बारा होते) म्हणू लागले, की बाबाजी, कुमारी गाईचं दूध तर पापाचं दूध आहे, आम्ही नाही पिणार. दुसरं, माहीत नाही आपण कोणत्या जातीचे आहात? तुमचं उष्टे दूध आम्ही नाही पिणार. तिसरं, हे दूध आपण जादु-मंत्र करून काढलं आहे, आमच्यावर जादु-मंत्राचा दुष्प्रभाव पडेल.

असे म्हणून ज्या जांडीच्या झाडाखाली बसले होते तिथून निघून गेले. दूर जाऊन कोण्या वृक्षा खाली जाऊन बसले. तेव्हा बालक गरीबदास जी म्हणाले, की हे बाबाजी! आपलं उष्टे दूध तर अमृत आहे. मला द्या, थोडं दूध बालक गरीबदास जींनी घेतलं. जिंदा वेशधारी परमेश्वरांनी संत गरीबदास जींना ज्ञान उपदेश दिला. तत्वज्ञान (सुक्ष्मवेदाचं ज्ञान) सांगितलं. संत गरीबदास जींच्या अति आग्रहाखातर परमेश्वरांनी त्यांच्या आत्म्याला शरीरापासून विलग केलं आणि वरच्या आध्यात्मिक लोकांची सफर घडवली.

संत गरीबदास जींना सतलोक तसेच अन्य लोकांचे दर्शन करविले

एका ब्रम्हांडामधील स्थित सर्व लोक दाखवले. श्री ब्रह्मा, श्री विष्णू तसेच श्री शिव जींची भेट करवली.  त्यानंतर ब्रह्म लोक तसेच श्री देवी (दुर्गा) चा लोक दाखवला. मग दहावे द्वार (ब्रह्मरंध्र) पार करून काळब्रह्म च्या २१ ब्रह्मांडांच्या शेवटच्या टोकावर असलेले अकरावे द्वार पार करून, अक्षर पुरुषाच्या सात शंख ब्रम्हांडवाल्या लोकांमध्ये प्रवेश केला. संत गरीबदास जींना सर्व ब्रह्मण्डे दाखवली, अक्षर पुरुषा सोबत भेट करवली. अगोदर त्याचे दोन हात होते, परंतु परमेश्वर जवळ येताच अक्षर पुरुषाने दहा हजार (10000) हातांचा विस्तार केला. जसं मयूर (मोर) पक्षी आपला पिसारा (पंख) फुलवतो. अक्षर पुरुषाला जेव्हा संकटाचा अंदाज येतो, तेव्हा तो असे करतो. आपल्या शक्तीचे प्रदर्शन करतो, कारण की अक्षर पुरुष जास्तीत-जास्त दहा हजार हातच केवळ दाखवू शकतो. याचे दहा हजार हात आहेत. क्षर पुरुषाचे एक हजार हात आहेत. गीता अध्याय 10 श्लोक 11 मध्ये आपलं 1000 हातांचं विराट रूप दाखवलं. गीता अध्याय 11 श्लोक 46 मध्ये अर्जुनाने म्हटले, की हे सहस्त्रबाहों! (1000 भूजा वाले) आपल्या चतुर्भुज रूपामध्ये परत या. संत गरीबदास जींना अक्षर पुरुषाच्या सात शंख ब्रम्हांडांचं भेद सांगितलं व समक्ष दाखवून परमेश्वर जिंदा बाबा बाराव्या (12व्या) द्वारासमोर घेऊन गेले, जे अक्षर पुरुषाच्या लोकाच्या सीमेवर बनलेलं आहे.

जेथून भवर गुहेमध्ये प्रवेश केला जातो. जिंदा वेश धारी परमेश्वरांनी संत गरीबदास जींना सांगितले, की दहावे द्वार ( ब्रम्हरंध्र) आहे. ते मी सत्यनामाच्या जपाने उघडलं होतं. जे अकरावे (11वे) द्वार आहे, ते मी तत् तसेच सत् ( जे सांकेतिक मंत्र आहेत ) ने उघडलं होतं. इतर कोणत्याही मंत्राने त्या द्वारांवर लागलेले कुलूप (Locks) उघडत नाहीत. आता हे बारावं (12 वं) द्वार आहे, हे मी सत् शब्द (सारनाम) ने उघडेल. या व्यतिरिक्त कोणत्याही नामाच्या जपाने हे उघडू शकत नाही. तेव्हा परमात्मांनी मनोमन सारनामाचा जप केला, 12 वं (बारावं) द्वार उघडले. आणि परमेश्वरांनी जिंदा रूपात तसेच संत गरीबदास जींच्या आत्म्याने भंवर गुहेमध्ये प्रवेश केला.

10 वर्षाच्या गरीबदास जी यांना सतलोकाचे अद्भुत दृश्य दाखविले

त्या नंतर सतलोकात प्रवेश केल्यावर त्या श्वेत घुमटाच्या समोर उभे राहिले ज्याच्या मध्यावर सिंहासनावर (उर्दु मध्ये ज्याला तख्त म्हणतात) तेजोमय श्वेत नर रूपात परम अक्षर ब्रह्म जी विराजमान होते. ज्यांच्या एका रोमातून (शरीरा वरील केस ) एवढा प्रकाश निघत होता जो करोडो सूर्य तथा तेवढ्याच चंद्रांच्या (चन्द्रमांच्या) मिळत्या- जुळत्या प्रकाशाहून अधिक होता. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो कि त्या परम अक्षर ब्रह्म (सत्य पुरुष) जीं च्या संपूर्ण शरीराचे तेज किती असेल. सतलोक स्वयं हिर्या प्रमाणे प्रकाशमान आहे. त्या प्रकाशाला जो परमेश्वर जीं च्या पवित्र शरीरातून तथा त्यांच्या अमर लोकातून  निघत आहे, केवळ आत्म्याच्या डोळ्यांनीच (दिव्य दृष्टि) पाहीले जाऊ शकते. चर्म दृष्टि ने नाही पाहीले जाऊ शकत. मग जिंदा बाबा आपल्या सोबत बालक गरीबदास जींना घेऊन सिंहासनाच्या निकट गेले तथा ठेवलेला चवर उचलून तख्तावर बसलेल्या परमात्म्यावर फिरवू (चालवू ) लागले. बालक गरीबदास जींनी विचार केला की हा आहे परमात्मा, आणि हे बाबा तर परमात्म्याचे सेवक आहे. त्याच समयी तेजोमय शरीर वाले प्रभु सिंहासन त्यागून उभे राहिले, जिंदा बाबा च्या हातून चवर घेतला आणि जिंदा बाबा ला सिंहासनावर बसण्याचा संकेत केला. जिंदा वेशधारी प्रभु असंख्य ब्रह्मण्डांचे मालकांच्या रूपात सिंहासनावर बसले. पहिल्यावाला प्रभु जिंदा बाबा वर चवर करू लागला.

संत गरीबदास जी विचार करतच होते कि परमेश्वर कोन असू शकतो? एवढ्यात तेजोमय शरीर वाले प्रभु जिंदा बाबा वाल्या शरीरात सामावून गेले, दोघे मिळून एकच झाले. जिंदा बाबा च्या शरीराचे तेज तेवढेच झाले, जेव्हढे तेज आधी सिंहासनावर बसलेल्या सत्य पुरुषजींचे होते. काही क्षणातच परमेश्वर म्हणाले, “हे गरीबदास! मी असंख्य ब्रह्मण्डांचा  स्वामी आहे. मीच सर्व ब्रह्मण्डांची रचना केली आहे. सर्व आत्म्यांना वचनाने मीच रचले आहे. पाच तत्व तथा सर्व पदार्थ पण मीच रचले आहे. क्षर पुरुष (ब्रह्म) तथा अक्षर पुरूष व त्यांच्या लोकांना पण मीच उत्पन्न केले आहे. त्यांना तपाच्या बदल्यात सर्व ब्रह्मण्डांचे राज्य मीच प्रदान केले आहे. मी 120 वर्षा पर्यंत पृथ्वी वर कबीर नावाने विणकराची भूमिका करून आलो होतो.

पूर्ण परमात्मा कबीर जी द्वारा काशी मध्ये अवतरणाची सत्य कथा सांगणे

भारत देशाच्या (जम्बू द्वीप) काशी नगर (बनारस) मध्ये नीरु नीमा नामक पति-पत्नी राहात होते. हे मुसलमान विणकर होते. ते निःसंतान होते. ज्येष्ठ शुद्ध पूर्णमासात सकाळी (ब्रह्म मुहूर्तावर) लहरतारा नामक सरोवर मध्ये काशी च्या बाहेर जंगलात नवजात शिशु सारखे रूप धारण करून कमळाच्या फूलावर पहूडलो होतो, मी आपल्या ह्या स्थानावरून गति करून आलो होतो. नीरु विणकर तथा त्याची पत्नी प्रतिदिन त्याच तालावा वर स्नानार्थ जात असे.  त्या दिवशी मला बालक रुपात प्राप्त करून अत्यंत खुश झाले मला आपल्या घरी घेऊन गेले. मी  25 दिवसा पर्यंत कसलाच आहार केला नव्हता. तेव्हा शिवजी एका साधु च्या वेशात त्यांच्या घरी गेले. ती सर्व माझीच प्रेरणा होती. शिवजींना म्हटले की मी कुमारी गाई चे दूध पितो तेव्हा नीरु ने एक बछडे आणले. शिवजींना मी शक्ति प्रदान केली, त्यांनी बछड्याच्या कमरेवर आपला आशीर्वादाने भरलेला हाथ ठेवला. कुमारी गाई ने दूध दिले तेव्हा मी दूध पिले होते. प्रत्येक युगात मी अशीच लिला करतो. जेव्हा मी शिशु रूपात प्रकट होतो, तेव्हा कुमारी गाईं कडून माझे संगोपनाची लिला होते.  हे गरीब दास! चारही वेद माझीच महिम्याचे गुणगान करत आहेत. 

वेद मेरा भेद है, मैं नहीं वेदन के मांही।

जिस वेद से मैं मिलूं, वह वेद जानते नाहीं।।

ऋग्वेद मण्डल 9 सूक्त 1 मन्त्र 9 मध्ये लिहीले आहे, की जेव्हा परमेश्वर शिशु रूपात पृथ्वी वर प्रकट होतात तेव्हा त्यांच्या संगोपनाची लिला कुमारी गाईं द्वारे होते.  मी सत्ययुगात “सत्यसुकत” नावाने प्रकट झालो होतो. त्रेतायुगात “मुनीन्द्र” नावाने तथा द्वापर मध्ये  “करुणामय’ नावाने आणि संवत् 1455 ज्येष्ठ शुद्धि पूर्णमासी ला मी कलयुगात “कबीर” नावाने प्रकट व प्रसिद्ध झालो होतो. हा सर्व प्रसंग ऐकून संत गरीबदास जींनी म्हटले की  परवरदिगार! हे ज्ञान मला कसे लक्षात रहील? तेव्हा परमेश्वर कबीर बालक गरीबदास जींना आशीर्वाद दिला आणि म्हटले की मी तुझा ज्ञानयोग खुला केला आहे. आध्यात्म ज्ञान तुझ्या अंतःकरणात टाकले आहे. आता आपण असंख्य युगांच्या सुरवाती पासुन वर्तमान आणि भविष्यच्याचे ज्ञान देखिल आठवणीत ठेवाल.

संत गरीबदास जी, यांना मृत समजून, अंतिम संस्काराची तयारी

दुसरी कडे खाली पृथ्वी वर दुपार नंतर 3 वाजता च्या आसपास अन्य गुराख्यांना (गोपालक) यांना आठवण आली की, गरिबदास येथे नाही, त्यांना उठवुन आणा. तेव्हां एक गुराखी गेला. त्याने दुरुन आवाज़ दिला अरे गरिबदास! इकडे ये गाई समोर उभे राहुन आपल्या पाळी प्रमाणे गाई राख आम्ही खुप वेळा पासून राखत आहोत! भक्त गरिबदास काही बोलले नाही आणि उठले ही नाही. कारण पृथ्वी वर केवळ शरीर होते जीवात्मा तर वर अन्य लोकांत फिरत होती. त्या गुराख्याने जवळ जाउन हाताने शरीर हालविले तेव्हा शरीर जमिनीवर पडले. पहिले शरीर सुखासन अवस्थेत होते. गुराख्याने पाहिले तेव्हा बालक गरिबदास जी मृत होते त्याने आरडा ओरड केली, अन्य गुराखी पळत आले. त्यांच्यातील एक गाव छुडाणी कडे पळत गेला, छुडाणी गावा पासून कबलाना गावाच्या रस्त्यावर ते जांडीचे झाड होते. ज्या खाली परमेश्वर जी जिंदा रुपात गरिबदास जी आणि इतर गुराख्या सोबत बसले होते. कबलाना गावाच्या सिमेलगत ते शेत लागुन होत जे छुडाणी गावाचं होत. ते शेत गरिबदास यांचे च होते. ते स्थळ छुडाणी पासून दिड किलोमीटर अंतरावर आहे.

छुडाणी गावात जाऊन त्या गुराख्याने गरिबदास जींच्या आई-वडील, आजी – आजोबांना सर्व हकिगत सांगितली. एका साधुने कुवारी गाईचे दुध जादु – मंत्र करुन काढले, ते दुध आम्ही पिलं नाही परंतु बालक गरिबदास यांनी पिलं. आम्ही आता पाहिले तो मेला आहे. मुलाच्या देहाला चितेवर ठेवून अंतिम संस्कार करण्याची तैयारी झाली, त्याच वेळी परमेश्वर जी म्हणाले हे गरिबदास! तु आता खाली पृथ्वी वर जा. तुझ्या शरीराला नष्ट केले जाणार आहे. संत गरिबदास जी यांंनी खाली पाहिले तेव्हां पृथ्वी लोक सतलोकाच्या तुलनेत नरक लोका समान दिसत होती. संत गरिबदास जी म्हणाले हे परमेश्वर जी! मला खाली पृथ्वी वर नका पाठऊ, येथेच ठेवा. तेव्हां सत्यपुरुष कबीर जी म्हणाले, तु पहिले भक्ति कर, जी साधना मी तुला सांगेल, त्या साधनेच्या भक्ति कमाई (शक्ति) ने तु येथे स्थायी स्थान प्राप्त करशील.

समोर पहा तुझा बंगला येथे खाली पडला आहे. सर्व खाद्य पदार्थ भरलेले आहेत. खाली पृथ्वी वर पाऊस पडला तरच अन्न धान्य होईल. किती मेहनत करावी लागते. येथील पदार्था प्रमाणे पदार्थ पृथ्वी वर नाहीत. तु खाली जा. प्रथम मंत्र मी तुला दिला आहे. नंतर तुला सतनाम देण्यासाठी येईल. हे सतनाम दोन अक्षरांचे असते. एक ऊँ अक्षर दुसरे तत् (हे सांकेतिक) आहे. नंतर काही दिवसांनी तुला सारनाम देईल. या सर्व नामांच्या (प्रथम, दुसरे आणि तिसरे) साधनेने तु येथे येशील. मी प्रत्येक वेळी भक्तांच्या सोबत राहतो चिंता करु नको. आता लवकर जा.

एव्हढे म्हणून परम अक्षर पुरुष जी यांनी सन्त गरीबदास जींचे जीवाला शरीरामध्ये प्रवेश करुन दिला. सर्व परिवाराचे लोक, चितेला अग्नि देणारच होते, त्याचवेळेस मुलाच्या शरीरामध्ये हालचाल झाली. शवाला दोरीने बांधून घेऊन जातात, ती दोरी सुद्धा आपोआप तुटली. सन्त गरीबदासची उठून बसले, चितेवरुन खाली उतरुन, उभे राहिले. उपस्थित गावाच्या व परिवाराच्या व्यक्तिंना आनंदाने भरुन आले. बालक गरीबदास वर डोळे करुन परमात्म्याला बघत होता तसेच जे अमृतज्ञान परमेश्वर जींनी, त्यांच्या अंतःकरणामध्ये टाकले होते, ती अमृतवाणी, दोहें व चौपाई तसेच शब्दांच्या रुपामध्ये बोलू लागला. गाववाल्यांना त्या अमृतवाणीचे ज्ञान नव्हते, त्यामुळे त्यांनी विचार केला कि, मुलाला बाबाने, झपाटले, ज्या कारणाने बडबड करीत आहे. काहीच्या काही बोलत आहे. परंतु परमात्म्याचे शेकडोच्या शेकडो आभार मानीत होते कि मुलीचा मुलगा जिवंत झाला. वेडा आहे तरीहि मुलगी, रानी देवी आपले ह्रदय थांबवून आनंदी राहील. असे समजून महापुरुष गरीबदास जी, यांना वेडा (गावाच्या भाषेमध्ये बावळट) म्हणू लागले.

संत गोपालदास जी यांनी आग्रह केल्यामुळे, संत गरीबदास जी यांच्या अमृत वाणींच्या अमर ग्रंथाची रचना

या घटनेच्या तीन वर्षानंतर एक गोपाल दास सन्त गाव छुडानीमध्ये आला. जो दादू दास जी, यांच्या पंथाची दीक्षित होता. तो सन्तांची वाणी समजत होता. त्याचे महत्व जाणत होता. तो वैश्य जाती चा होता, सन्त वेशभूषे मध्ये राहत होता. वाण्याच्या घरी जन्म झाला असल्या कारणाने, काही वाचू-लिहू शकत होता. घराचा त्याग करुन सन्यास घेतला होता. अधिकांश भटकन्ती करीत राहत होता. गावो-गावी जाऊन प्रचार करीत होता. काही शिष्य सुद्धा बनविले होते. त्याचा एक बैरागी जातीचा, छुडानी गावाचा सुद्धा एक शिष्य होता. तो त्याच्या घरी थांबला होता. त्या शिष्याने सन्त गोपाल दास, यांना म्हटले कि, हे गुरुदेव! आमच्या गावाच्या चौधरीचा नातू (मुलीचा मुलगा) कोणत्या साधुने झपाटल्यामुळे वेडा झाला. तो तर मेला होता, चितेवर ठेवले होते. मुलगी रानीच्या नशिबाने मुलगा जिवंत तर झाला, परंतु वेडा झाला.

सर्व ठिकाणी प्रेत बाधा काढणा-यांकडून सुद्धा उपचार केला, इतर औषधी वेडेपणा दूर करण्याची सुद्धा खाऊ घातली, परंतु कोणताहि आराम मिळाला नाही. त्या शिष्याने ती सर्व घटना सुद्धा सांगितली, जी कुवांरी गाईचे दूध, काढून मुलाला, गरीबदास जी, यांना पाजल्यामुळे घडली होती. नंतर त्याने म्हटले कि, असे म्हणतात कि, संताच्या विद्येला संतच काटू शकतो. काही कृपा करा गुरुदेव! सन्त गोपाल दास जी, यांनी म्हटले कि, बोलवा त्या मुलाला. शिष्याने चौधरी शिवलाल जी, याला म्हटले कि, माझ्या घरी एक बाबा जी आले आहेत. मी त्यांना आपला नातू, गरीबदासच्या बाबतीत सांगितले. बाबा जी ने म्हटले कि, एक वेळ बोलवा, ठीक होऊन जाईल. एक वेळ दाखवा, आता तर गावातच बाबा जी आला आहे, खूप मोठा संत आहे.

शिवलाल जी सोबत गावातील इतर अनेक लोकही बाबांकडे गेले. त्यांच्यासोबत मुलांनी गरीबदास जींना ही घेतले. संत गोपालदास जींनी गरीबदास जींना विचारले की बेटा! कोण होते ते बाबा? ज्याने तुमचे आयुष्य बरबाद केले? येथे प्रिय वाचकांना सांगणे आवश्यक आहे की संत गोपालदास जी यांनी संत दादू दास जी यांच्या पंथाची दीक्षा घेतलेली होती. संत गरीबदास जी प्रमाणे, संत दादू जींना ही वयाच्या 7 व्या वर्षी (एका पुस्तकात जिन्दा बाबा वयाच्या 11 व्या वर्षी भेटले होते ऐसे लिहलेले आहे. आपल्याला ज्ञान समजले पाहिजे, व्यर्थ तर्क वितर्क मधे नाही पडायचेय.) बाबा जिंदा च्या वेषात परमेश्वर कबीर साहेबजी दादू जींना भेटले. परमेश्वरानी संत दादू जींना त्यांच्या शरीरातून बाहेर काढले आणि सतलोकात नेले. संत दादूजी तीन दिवस आणि रात्री बेशुद्ध अवस्थेत राहिलेले. तिसर्‍या दिवशी शुद्धीत आल्यावर मी परमेश्वर कबीरां सोबत अमर लोकांत गेलेलो, असे दादूजी म्हणाले होते. तो आलम मोठा कबीर आहे, तोच सर्वांचा रचयिता आहे. तो सर्व सृष्टीचा निर्माता आहे.

संत गरीबदास जींच्या वाणी मध्ये परमात्मा कबीर साहेब यांची महिमा.

जिन मुझको निज नाम दिया, सोई सतगुरु हमार।

दादू दूसरा कोई नहीं, कबीर सिरजन हार।। 1

दादू नाम कबीर की, जै कोई लेवे ओट।

उनको कबहु लागे नहीं, काल वज्र की चोट।। 2

अब ही तेरी सब मिटै, काल कर्म की पीड़ (पीर)।

स्वास-उस्वास सुमरले, दादू नाम कबीर।।3

केहरी नाम कबीर का, विषम काल गजराज।

दादू भजन प्रताप से, भागे सुनत आवाज।। 4

अशा प्रकारे दादूजीच्या ग्रंथा मधे वाणी लिहलेली आहे. गोपालदास जींना हे माहित होते की, दादू जींना जिन्दा बाबांच्या रूपात पूर्ण परमेश्वर भेटलेले होते. दादूजी मुस्लिम तेली होते. त्यामुळे मुस्लिम समाज कबीरचा अर्थ बड़ा म्हणजे मोठा असे करतात. त्यामुळे काशीतील विणकर परमेश्वर कबीर साहेबजी वर विश्वास ठेवत नाहीत. दादू पंथी म्हणतात की, कबीराचा अर्थ मोठा परमेश्वर अल्लाहू कबीर = अल्लाह कबीर असा आहे.

अशाच प्रकारे श्री नानक देव जी सुल्तानपुर शहराच्या जवळ वहात असलेल्या बेई नदी मध्ये स्नान करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना परमात्मा जिन्दा बाबाच्या रूपात भेटले होते. त्यांना पण तीन दिवसा पर्यंत आपल्या सोबत ठेवले होते. सच्चखण्ड (सतलोक) घेऊन गेले होते. व परत आणुन सोडले होते. एक अब्राहिम सुल्तान अधम नांवाचा बलख बुखारे शहर चा राजा होता (इराक देश चा रहीवासी होता. त्याला पण परमात्मा जिन्दा बाबा रूपात भेटले होते. त्याचा पण उध्दार कबीर परमेश्वर जी ने केला होता.

सन्त गोपालदास यांनी बालक गरीबदास यांना प्रश्न केला होता कि तुला कोण बाबा भेटला होता? ज्याने तुझे जीवन बर्बाद केले सन्त गरीबदास जींने उत्तर दिले होते की हे महात्मा जी! जो बाबा मला भेटला होता, त्याने माझे कल्याण केले, माझे जीवन सफल केले. ते पूर्ण परमात्मा आहेत.

गरीब, हम सुल्तानी नानक तारे, दादू कूं उपदेश दिया। जाति जुलाहा भेद नहीं पाया, काशी माहे कबीर हुआ।।1

गरीब, अनन्त कोटि ब्रह्मण्ड का, एक रती नहीं भार। सतगुरु पुरुष कबीर हैं, कुल के सिरजन हार।।2

गरीब, सब पदवी के मूल है, सकल सिद्धि है तीर।

दास गरीब सत्पुरुष भजो, अविगत कला कबीर।।3

गरीब, अजब नगर में ले गए, हमको सतगुरु आन। झिलके बिम्ब अगाध गति सुते चादर तान।।4

गरीब, शब्द स्वरुपी उतरे, सतगुरु सत् कबीर।

दास गरीब दयाल है, डिगे बंधावे धीर।।5

गरीब, अलल पंख अनुराग है, सुन मण्डल रह थीर। दास गरीब उधारिया, सतगुरु मिले कबीर।। 6

गरीब, प्रपटन वह लोक है, जहाँ अदली सतगुरु सार। भक्ति हेत से उतरे, पाया हम दीदार।। 7

गरीब, ऐसा सतगुरु हम मिल्या, है जिन्दा जगदीश।

सुन्न विदेशी मिल गया, छत्र मुकुट है शीश।।8

गरीब, जम जौरा जासे डरें, धर्मराय धरै धीर।

ऐसा सतगुरु एक है, अदली असल कबीर।। 9

गरीब, माया का रस पीय कर, हो गये डामाडोल।

ऐसा सतगुरु हम मिल्या, ज्ञान योग दिया खोल।।10

गरीब, जम जौरा जासे डरें, मिटें कर्म के लेख। अदली असल कबीर है, कुल के सतगुरु एक।।11

संत गरीबदास जींना कोन भेटले होते? बाबाजी ना त्याचे परिचय करून दिले. जे वर लिहिलेल्या वाण्यामध्ये संत गरीबदास जिंनी स्पष्ट केले आहे, की ज्या परमेश्वर कबीर जिंने आम्हा सर्वांना संत गरीबदास, संत दादू दास, संत नानकदेव व राजा अब्राहिम सुलतानी वगैरे वगैरे ना पार केले. ते भारत वर्षा मध्ये काशी शहरात कबीर जुलाहा नावाने प्रसिद्ध झाले आहेत. ते अनन्त कोटि ब्रह्मण्डांचे सर्जनहार आहेत. ते मला भेटले होते. ही वरील वाणी बोलून संत गरीबदास 13 वर्षीय बालक निघून चालले संत गोपालदास जी समजून गेले, की हे कोणी सामान्य बालक नहीये हा तर परमात्मासी भेटला आहे. अशी अमृत वाणी बोलत आहे. ह्या वाणीस लिहायला हवं.

असा विचार करून गोपालदास जी मुलगा गरीबदास जींच्या मागे मागे गेले आणि म्हणू लागले, अरे गाववाल्यानो! हा मुळगा वेडा नाही, आपण वेडे आहात. तो काय म्हणतोय, आपणाला समजत नाही. हे मूल परमेश्वराचाच अवतार आहे. जिंदा बाबांच्या रूपात त्यांना साक्षात परमेश्वर भेटलेले होते. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय दादू साहेब जींना ही परमेश्वर भेटले होते. दादूजींच्या सर्व वाणी लिहून ठेवलेले नाहीत. आता मी या मुलाला सर्व शब्द लिहायला लावीन, मी स्वतः लिहीन. या वाणीचा कलियुगातील अनेक जीवांना फायदा होईल.

संत गोपालदास जींच्या वारंवार विनंतीवर संत गरीबदास जी म्हणाले, गोपालदास जीं जर आपण संपूर्ण वाणी लिहिले तर मी ते लिहून देईन, जर ते मधेच कुठेतरी सोडणार असचाल तर मी ते लिहून देणार नाही. संत गोपालदास जी म्हणाले, महाराज जी, मी परमार्थासाठी आणि कल्याण करण्यासाठी घर सोडले आहे, माझे वय 62 आहे. माझ्याकडे यापेक्षा चांगले काम नाही. आपण कृपया करा.

मग संत गरीबदास जी आणि संत गोपालदास जी बेरीच्या बागेत एका जांडीच्या झाडाखाली बसले आणि वाणी लिहून घेतली. ती बेरीची बाग संत गरीबदास जींची स्वतःचीच होती. त्या वेळी चुडाणी गावा भोवती राजस्थान प्रमाणे वळवंटा सारखा परिसर होता. जांडीची झाडे जास्त असायची. त्याची सावली जास्त वापरली जायची. अशा रीतीने संत गरीबदास जी परमात्मा कडुन ऐकलेली वाणी बोलले आणि संत गोपालदास जींनी परमेश्वराकडून मिळालेले तत्वज्ञान लिहून ठेवले. हे कार्य सुमारे सहा महिने चालले. मग जेव्हा जेव्हा कोणाशी संभाषण व्हायचे तेव्हा संत गरीबदासजी बोलत असत आणि इतर लोकही ते लिहून ठेवत असत.

हे सर्व एकत्र पुस्तकाच्या रूपात हाताने लिहिले होते. या ग्रंथाचे पठण संत गरीबदास जींच्या काळापासून सुरू झाले होते. तो काही वर्षांपूर्वी टाईप झाला होता. याशिवाय परमेश्वर कबीर साहेब जींनी अमृत सागर (कबीर सागर) आपल्या मुख कमळातून लिहलेला होता. या सूक्ष्म वेद तील काही वाणी ग्रंथाच्या शेवटी काही अमृतवाणी लिहिली आहेत, या अमृत वाणीच्या पवित्र ग्रंथाला अमर ग्रंथ असे नाव देण्यात आले आहे. या अमृतवाणीचा अर्थ आता मांडला जात आहे.

लेखक आणि निवेदक:-

(संत) रामपाल दास

सतलोक आश्रम

टोहाणा रोड, बारवाला. जिल्हा हिसार  (हरियाणा)

SA NEWS
SA NEWShttps://news.jagatgururampalji.org
SA News Channel is one of the most popular News channels on social media that provides Factual News updates. Tagline: Truth that you want to know

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
spot_imgspot_img

Popular

More like this
Related